Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडसर्च तर्फे अकरावी आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा संपन्न * वेलिंगकर इन्स्टिट्यूट...

इंडसर्च तर्फे अकरावी आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा संपन्न * वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरूची राजेश्वरी हिरेमठ ठरली विजेती

पुणे, 28 नोव्हेंबर २०२४ : इंडसर्चच्या प्रोफेसर प्रमोद पारखी सेंटर फॉर बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स तर्फे अकरावी आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा (इंटर कॉलेजिएट रिसर्च पेपर कॉम्पिटिशन) आयोजित करण्यात आली होती. इमर्जिंग ट्रेंड्स इन पर्सनल फायनान्स : रिस्क्स अँड बेनिफिट्स ही या स्पर्धेची संकल्पना होती. ही स्पर्धा इंडसर्चच्या बावधनच्या कॅम्पसमध्ये पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन सेपिएंट फिनसर्व्ह प्रा.लि.चे संस्थापक व संचालक अमित बिवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इंडसर्चचे सरसंचालक डॉ.अशोक जोशी, संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर, युजी प्रोग्रॅमच्या डीन व इंटरनॅशनल रिलेशन्सच्या प्रमुख डॉ.सुनिता जोशी आणि आयोजन समितीच्या अध्यक्ष प्रा. देवकी जैन आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत १० महाविद्यालयांतील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एकूण २२ संशोधन प्रबंध सादर करण्यात आले.

या स्पर्धेत वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरूची राजेश्वरी हिरेमठ प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. दुसरे पारितोषिक इंडसर्च एमबीए, पुणेच्या भावेश मिश्रा याने तर तृतीय पारितोषिक बीएमसीसी पुणे मधील वेदिका भदाणे यांना मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिक इंडसर्च बीएमएस, पुणेच्या यथार्थ सत्यवर्पू यांना मिळाले.

सी.ए.ऋता चितळे,सी.ए. डॉ.प्रिया आगाशे, डॉ. सतीश इनामदार आणि डॉ. विकास पेशवे यांनी या स्पर्धेत परीक्षकांची भूमिका बजावली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी दळवी (बीएमएस सीएबीए द्वितीय वर्ष) आणि क्षितिज मोरे (बीबीए आयबी द्वितीय वर्ष) यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments