Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedआरोग्‍यदायी बदामांच्‍या सेवनासह साजरा करा कापणीचा हंगाम!

आरोग्‍यदायी बदामांच्‍या सेवनासह साजरा करा कापणीचा हंगाम!

भारत, XX जानेवारी २०२४: भारतात कापणीचा उत्‍सव मोठ्या जल्‍लोषात साजरा केला जातो, तसेच देशभरात या सणाच्‍या विविध परंपरा आहेत. वैविध्‍यतेने नटलेल्‍या भारतात लोक विविध पद्धतीने कापणीचा उत्‍सव साजरा करतात. अशी विविधता असली तरी सण साजरा करण्‍याचे मुलभूत तत्त्‍व बदललेले नाही. माघी म्‍हणून संबोधिले जाणारा हा उत्सव उत्तर भारतात लोहरी, ईशान्येत माघ बिहू, पश्चिमेला उत्तरायण, दक्षिणेला पोंगल आणि दक्षिण व पूर्वेला मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. देशभरात ही परंपरा जपली जाते, तसेच सण साजरा करण्‍यासह पीकांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त केली जाते आणि शेतकरी व समुदाय एकत्र येत उत्‍साहात सण साजरा करतात.

या काळादरम्‍यान परंपरेनुसार आपण सर्व विविध प्रकारच्‍या गोड पदार्थांचा आस्‍वाद घेतो. पण, भारतात मधुमेहासारख्‍या जीवनशैली आजारांचे वाढते प्रमाण पाहता सण साजरा करण्‍यासह स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. म्‍हणून, यंदा कापणीच्‍या सणादरम्‍यान भेट म्‍हणून तुमच्‍या मित्र-परिवाराला पारंपारिक मिठाई देण्‍याऐवजी आरोग्‍यदायी बदाम देण्‍याचा विचार करा.

‘उत्तम आरोग्‍याचे गिफ्ट’ म्‍हणून अनेकदा प्राधान्‍य दिले जाणारे बदाम या खास क्षणांदरम्‍यान पौष्टिक पर्याय आहेत. पौष्टिक मूल्‍यासाठी ओळखले जाणाऱ्या बदामांमध्‍ये मॅग्‍नेशियम, फॉस्‍फरस व कॅल्शियम यांसारखे आवश्‍यक पौष्टिक घटक आहेत. तसेच बदाम झिंकचा स्रोत आहेत. हा पौष्टिक घटक व्‍यक्‍तीची वाढ, विकास आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच बदामांमध्‍ये प्रथिने व अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट व्हिटॅमिन ई देखील संपन्‍न प्रमाणात आहे. संशोधनामधून सातत्‍याने आहारामध्‍ये बदामांचा समावेश करण्‍याचे अनेक फायदे निदर्शनास आले आहेत, जसे हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहते, टाइप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते आणि भूकेचे शमन होते.

सणाचा आनंद घेण्‍यासोबत आरोग्‍याला प्राधान्‍य देण्‍याच्‍या महत्त्वाबाबत सांगताना फिटनेस एक्‍स्‍पर्ट आणि सेलिब्रिटी मास्‍टर इन्‍स्ट्रक्‍टर यास्‍मीन कराचीवाला म्‍हणाल्‍या, ”सणासुदीचा काळ मेजवानी व साजरीकरणाचा आहे, ज्‍यामुळे मनसोक्‍तपणे खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेणे स्‍वाभाविक आहे. माझ्या जीवनात मी संतुलन व संयम राखते. मला स्‍वत:ला उत्‍साहात सण साजरा करायला आवडते, पण त्‍यासोबत आरोग्‍याची काळजी घेण्‍याची खात्री घेते. मी सर्वांना या मंत्राचे पालन करण्‍याचे आवाहन करते. आरोग्‍य बहुमूल्‍य असल्‍यामुळे प्रियजनांना गिफ्ट्स देताना कॅलरीयुक्‍त व गोड पदार्थांऐवजी बदामासारखे आरोग्‍यदायी पर्याय देण्‍याचा विचार करा. हे पोषण-संपन्‍न नट्स उत्तम आरोग्‍याची खात्री देतात, तसेच सर्व प्रसंग व सणांसाठी उत्तम भेट देखील आहेत. दैनंदिन आहार नित्‍यक्रमामध्‍ये बदामांचा समावेश केल्‍यास आरोग्‍य उत्तम राहण्‍यासह विविध आरोग्‍यविषयक आजारांपासून संरक्षण देखील होते. बदामांमध्‍ये भूकेचे शमन करण्‍याचे गुणधर्म देखील आहेत, ज्‍यामुळे वजनावर नियंत्रण राहण्‍यास मदत होऊ शकते, तर मग, आरोग्‍याची काळजी घेत सणाचा आनंद घ्‍या!”

न्‍यूट्रिशन व वेलनेस कन्‍सल्‍टण्‍ट शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, ”सण प्रियजनांसोबतचे नाते अधिक दृढ करण्‍याची आणि त्‍यांच्‍याप्रती प्रेम, आपुलकी व काळजी व्‍यक्‍त करण्‍याची संधी देतात, पण सणादरम्‍यान आपण उत्‍सवी उत्‍साहामध्‍ये सामावून जात खाद्यपदार्थांचा मनसोक्‍त आस्वाद देखील घेतो. यासंदर्भात काळजी घेण्‍यासाठी सण साजरीकरणाचा आनंद घेण्‍यासह पारंपारिक गोड पदार्थांऐवजी आपण आरोग्‍यदायी पर्यायांची निवड करत आरोग्‍यदायी बदल करू शकतो. असाच एक आरोग्‍यदायी पर्याय म्‍हणजे बदाम. बदामांमध्‍ये अनेक पौष्टिक घटक आहेत, बदाम अनेक पारंपारिक भारतीय पाककलांमध्‍ये सहजपणे समाविष्‍ट करता येऊ शकतात आणि जेवणादरम्‍यान सेवन करण्‍यासाठी उपयुक्‍त आहेत. बदामांबाबत सर्वोत्तम बाब म्‍हणजे ते चवीला उत्तम आहेत आणि कोणत्‍याही मसाल्‍यांसोबत मिक्‍स करता येऊ शकतात, ज्‍यामुळे बदाम उत्‍सवी पाककलांमधील स्‍वादिष्‍ट व पौष्टिक पर्याय आहेत. संशोधनामधून निदर्शनास येते की, बदाम उपवासादरम्‍यान इन्‍सुलिन पातळ्यांवर परिणाम करणाऱ्या कार्बोहायड्रेट पदार्थांचे रक्‍तातील शर्करेवरील परिणाम कमी करण्‍यामध्‍ये मदत करू शकतात. आरोग्‍यदायी आहारासोबत बदामांचे सेवन केल्‍याने एकूण व एलडीएल कोलेस्‍ट्रॉल कमी झाल्‍याचे, तसेच हृदयाची जळजळ कमी झाल्‍याचे दिसून आले आहे.”

दिल्‍ली येथील मॅक्‍स हेल्‍थकेअरच्‍या डायटेटिक्‍सच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्‍हणाल्‍या, ”सणादरम्‍यान आपण गोड पदार्थ आणि इतर तळलेल्‍या स्‍नॅक्‍सचा मनसोक्‍त आस्‍वाद घेतो. पण बदामांचे सेवन करत यावर नियंत्रण ठेवण्‍याचे अनेक उत्तम मार्ग आहेत. बदाम स्‍वादिष्‍ट व आरोग्‍यदायी पर्याय आहेत, जे साजरीकरणासोबत आरोग्‍य उत्तम राहण्‍याची खात्री देतात. प्रक्रिया केलेल्‍या स्‍नॅक्‍सऐवजी आवश्‍यक पौष्टिक घटक असलेले बदाम सुके किंवा रोस्‍टेड स्‍वरूपात सेवन केल्‍यास पारंपारिक कापणी सीझनचा आनंद घेण्‍यासह स्‍वाद व आरोग्‍यामध्‍ये संतुलन राहण्‍याची खात्री मिळते. संशोधनामधून निदर्शनास येते की, बदामांच्‍या नियमित सेवनामुळे घातक एलडीएल कोलेस्‍ट्रॉल पातळ्या कमी होऊ शकतात आणि आरोग्‍यदायी आहारामध्‍ये समाविष्‍ट केल्‍यास संरक्षणात्‍मक एचडीएल कोलेस्‍ट्रॉल कायम राहण्‍यास मदत होऊ शकते. तसेच टाइप-२ मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींसाठी हृदयाची जळजळ कमी होण्‍यामध्‍ये देखील मदत होऊ शकते.”

इंटीग्रेटिव्‍ह न्‍यूट्रिशनिस्‍ट आणि हेल्‍थ कोच डॉ. रोहिनी पाटील म्‍हणाल्‍या, ”सणादरम्‍यान पारंपारिक मिष्‍टान्‍नांचा आस्‍वाद घेणे स्‍वाभाविक आहे, पण त्‍यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. गोड पदार्थ व मिष्‍टान्‍ने अल्‍पकाळासाठी सेवन केले तरी त्‍यांचा दीर्घकाळापर्यंत आरोग्‍यावर नकारात्‍मक परिणाम होतो. लक्षपूर्वक खाण्‍याला प्राधान्‍य देणे आवश्‍यक आहे. कापणीचा सण साजरा करताना पारंपारिक स्‍नॅकिंगऐवजी आरोग्‍यदायी पर्यायांसह नववर्ष सुरू करण्‍याचा विचार करा. सणांदरम्‍यान आरोग्‍यदायी पर्यायाचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे आणि यापैकी महत्त्वाचा पर्याय म्‍हणजे मूठभर बदामांचे सेवन. बदाम आरोग्यदायी पर्याय आहेत, बदामांमध्‍ये व्हिटॅमिन ई, आयर्न, मॅग्‍नेशियम, झिंक सारखे अनेक आवश्‍यक पौष्टिक घटक असतात. संशोधनामधून निदर्शनास येते की, दररोज बदामांचे सेवन केल्‍याने प्री-डायबेटीस सारख्‍या स्थिती वाढवण्‍यावर नियंत्रण राहण्‍यास आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते.”

प्रख्‍यात कन्‍नड अभिनेत्री प्रणिता सुभाष म्‍हणाल्‍या, ”संक्रांती सणादरम्‍यान आपण घरामध्‍ये स्‍वादिष्‍ट पारंपारिक गोड पदार्थ तयार करत आणि मित्र-परिवाराला गिफ्ट्स देत सण साजरा करतो. मी विशेषत: सणादरम्‍यान माझ्या आरोग्‍याला अधिक प्राधान्‍य देते. तसेच, मी उत्‍सवी पाककलांमध्‍ये बदामासारख्‍या पौष्टिक घटकांचा समावेश करण्‍याचा प्रयत्‍न करते. बदाम स्‍वादिष्‍ट व आरोग्‍यदायी आहेत आणि कोणत्‍याही भारतीय मसाल्‍यांसोबत मिक्‍स करता येऊ शकतात. बदाम व्हिटॅमिन ई, आयर्न, मॅग्‍नेशियम, झिंक यांसारख्‍या आवश्‍यक पौष्टिक घटकांचे स्रोत देखील आहेत. मी गिफ्ट्स म्‍हणून बदामांचा बॉक्‍स देण्‍याची खात्री घेते, जेथे बदाम शुभ व उत्तम आरोग्‍याचे वरदान मानले जातात.”

प्रख्‍यात साऊथ इंडियन फिल्‍म व टेलिव्हिजन अभिनेत्री वानी भोजन म्‍हणाल्‍या, ”आम्‍ही आमच्‍या घरी कौटुंबिक परंपरेनुसार पोंगल सण साजरा करतो. इतर सणांप्रमाणे या सणादरम्‍यान देखील आम्‍ही आमच्‍या मित्र-परिवाराला गिफ्ट्स देतो. पण, मी भेटवस्‍तू देताना आरोग्‍याला अधिक प्राधान्‍य देते. साजरीकरणासह आरोग्‍याची खात्री घेण्यासाठी मी बदामांचा बॉक्‍स गिफ्ट म्‍हणून देते. बदामांमध्‍ये व्हिटॅमिन ई, आयर्न व झिंक यांसारखे आवश्‍यक पौष्टिक घटक असतात, जे रोगप्रतिकारशक्‍ती वाढवतात, तसेच आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत देखील करतात. मी सर्वांना दैनंदिन आहारामध्‍ये मूठभर बदामांचा समावेश करत याच मंत्राचे पालन करण्‍याचे आणि उत्‍सवाचा आनंद घेण्‍यासह आरोग्‍याकडे लक्ष देण्‍याचे आवाहन करते.”

###

कॅलिफोर्नियाचे बदाम हा नैसर्गिक, आरोग्‍यदायी व दर्जेदार खाद्यपदार्थ आहे. कॅलिफोर्नियातील ७,६०० बदाम उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियाकर्ते उद्योग यांच्या वतीने आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया विपणन, कृषी व उत्‍पादनाच्‍या सर्व पैलूंसाठी त्‍यांच्‍या संशोधन-आधारित दृष्टीकोनाच्‍या माध्‍यमातून बदामांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. याच्याशी संबंधित उद्योगांतील अनेक कुटुंबांचा हा परंपरागत व्यवसाय आहे. कॅलिफोर्नियातील मॉडेस्टोमध्ये असलेल्या आणि १९५० मध्ये स्थापन झालेली आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया ही ना-नफा तत्त्वावर असलेली संघटना आहे. ही संस्था युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागांतर्गत बदाम उत्पादकांच्या कृतिशील सहभागातून फेडरल मार्केटिंग ऑर्डरचे व्यवस्थापन करण्याचे काम करते. आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया किंवा बदामांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी www.almonds.in येथे

भेट द्या.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments