अत्याधुनिक फॅसिलिटीची दरवर्षाला २१,००० एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्स स्क्रॅप करण्याची क्षमता आहे
पुणे, ३० नोव्हेंबर २०२४: टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आणि टाटा इंटरनॅशनल ही टाटा ग्रुपची जागतिक ट्रेडिंग व वितरण शाखा यांनी आज पुण्यामध्ये नवीन रजिस्टर्ड वेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ)चे उद्धाटन केले. ‘Re.Wi.Re – रिसायकल विथ रिस्पेक्ट’ नाव असलेल्या या अत्याधुनिक फॅसिलिटीची पर्यावरणपूरक प्रक्रियांसह दरवर्षाला २१,००० एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्सचे विघटन करण्याची वार्षिक क्षमता आहे.
टाटा इंटरनॅशनलची पूर्णत: मालकीची उपकंपनी टाटा इंटरनॅशनल वेईकल अॅप्लीकेशन्स (टीआयव्हीए) या आरव्हीएसएफचे कार्यसंचालन पाहते. ही आरव्हीएसएफ सर्व ब्रॅण्ड्सच्या प्रवासी व व्यावसायिक वाहनांना स्क्रॅप करण्यासाठी सुसज्ज आहे.
या फॅसिलिटीचे उद्घाटन करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, ”टाटा मोटर्स गतीशीलतेच्या भविष्याला आकार देण्यामध्ये अग्रस्थानी आहे आणि आपली उत्पादने, सेवा व डिजिटल सोल्यूशन्सच्या माध्यमातून मूल्ये वितरित करत ग्राहकांसोबत यशस्वी होण्याकरिता सहयोग करण्यावर लक्ष केंद्रित करते. Re.Wi.Re मधून चक्रिय अर्थव्यवस्था निर्माण करण्यासोबत प्रगत रिसायकलिंग प्रकियांचा फायदा घेण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे एण्ड-ऑफ-लाइफ वाहनांमधून अधिक मूल्य मिळण्यासोबत आपल्या देशाच्या शाश्वतता ध्येयांप्रती योगदान देखील देता येते. टाटा इंटरनॅशनल विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आमची सहयोगी राहिली आहे आणि आम्हाला Re.Wi.Re सह नवीन चॅप्टरची भर करत या दीर्घकालीन संबंधाला अधिक दृढ करण्याचा आनंद होत आहे.”
उद्घाटनाप्रसंगी मत व्यक्त करत टाटा इंटरनॅशनल वेईकल अॅप्लीकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजीव बत्रा म्हणाले, ”टीआयव्हीए आणि टाटा मोटर्सने भारतातील वेईकल्सच्या जीवनचक्राप्रती दृष्टिकोनामध्ये परिवर्तन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दरवर्षाला २१,००० वेईकल्सचे विघटन करण्याच्या क्षमतेसह ही फॅसिलिटी कार्यक्षम व सुरक्षित वेईकल रिसायकलिंगसाठी वाढत्या गरजेची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. आम्हाला समाजासाठी शाश्वत व संघटित इकोसिस्टमला आकार देण्यामध्ये एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण भूमिका माहित आहे. हा उपक्रम शुद्ध व अधिक नियामक वेईकल-रिसायकलिंग फ्रेमवर्कप्रती भारताच्या परिवर्तनाला पाठिंबा देतो. टीआयव्हीएमध्ये आम्ही अथक मेहनत घेत नव्या उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, तसेच आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांना सर्वोत्तम सुविधा देण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
Re.Wi.Re हे अत्याधुनिक केंद्र आहे, जे सर्व ब्रॅण्ड्सच्या एण्ड-ऑफ-लाइफ प्रवासी व व्यावसायिक वेईकल्सचे विघटन करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आले आहे, जेथे पर्यावरणपूरक पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पाच Re.Wi.Re फॅसिलिटीज आधीच जयपूर, भुवनेश्वर, सुरत, चंदिगड आणि दिल्ली एनसीआर येथे यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
प्रत्येक Re.Wi.Re फॅसिलिटी पूर्णत: डिजिटाइज आहे आणि सर्व कार्यसंचालने विनासायास व पेपरलेस केली जातात. ही फॅसिलिटी व्यावसायिक व पॅसेंजर वेईकल्ससाठी सेल-टाइप व लाइन-टाइप डिस्मॅन्टलिंगसह (विघटन) सुसज्ज आहे, तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्टेशन्स आहेत. प्रत्येक वेईकल विशेषत: प्रवासी व व्यावसायिक वेईकल्सच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेल्या प्रखर डॉक्यूमेन्टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. असे करत देशातील वेईकल स्क्रॅपेज पॉलिसीनुसार विघटन प्रक्रियेमधून बारकाईने लक्ष दिल्याची, तसेच सर्व घटकांच्या सुरक्षित विघटनाची खात्री मिळते. Re.Wi.Re कन्सेप्ट व फॅसिलिटी ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.
टाटा इंटरनॅशनल वेईकल अॅप्लीकेशन्स (टीआयव्हीए) भारतातील सर्वात मोठी ट्रेलर उत्पादक कंपनी आहे. अजमेर, जमशेदपूर आणि पुणे येथे स्थित चार अत्याधुनिक उत्पादन केंद्रांसह कंपनीने ट्रेलर व ट्रक बॉडी-मॅन्युफॅक्चुरिंग क्षेत्रातील अग्रणी म्हणून स्वत:ला स्थापित केले आहे. उत्पादक कंपनी विविध उपयोजनांना सेवा देण्यासाठी प्रगत इंजीनिअरिंग टेक्निक्स आणि कस्टम डिझाइन क्षमतांचा फायदा घेते.