Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedअहमदनगर येथे सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

अहमदनगर येथे सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. 2: यांत्रिकी पायदळ केंद्र आणि शाळा, (पंकज जोशी स्टेडियम) अहमदनगर येथे 14 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत पुरुष आणि महिलाकरीता सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

या मेळाव्याअंतर्गतअहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या पुरुष उमेदवाराकरीता मुख्यालय रिक्रूटिंग झोन, पुणे यांच्या अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा महाराष्ट्र आणि गुजरात, गोवा दमण, दीव आणि दादर, नगर हवेली केंद्रशासित प्रदेश या राज्यांतील निवड झालेल्या सुमारे ७ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

तरी पात्र उमेदवारांनी अहमदनगर येथे उपस्थित रहावे, असे आवाहनजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments