Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासनमान्य ग्रंथालयांना पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

शासनमान्य ग्रंथालयांना पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि.१९ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

 

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा मिळाव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’ देण्यात येतो.

 

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ” “ब” “क” “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ७५ हजार, रुपये ५० हजार व रुपये २५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

 

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये ५० हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

 

सन २०२२-२३ या वर्षातील पुरस्कारासाठी इच्छूक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज तीन प्रतीत मुदतीत त्यांच्याजिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments