गुरुग्राम, १० डिसेंबर २०२४ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने आपली वायरलेस इनफ्लाइट मनोरंजन सेवा व्हिस्ता स्ट्रीम नॅरोबॉडी फ्लीटमध्येही देण्याचे ठरवले असून त्याद्वारे प्रवाशांचे अखंड मनोरंजन करण्याचे ध्येय आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेली व्हिस्ता स्ट्रीम यापूर्वीच एयर इंडियाच्या वाइडबॉडी फ्लीटमध्ये (नवीन बोईंग ७७७ आणि एयरबस ३५० एयरक्राफ्ट) उपलब्ध करण्यात आली आहे. आता व्हिस्ता स्ट्रीम वाइडबॉडी आणि नॅरोबॉडी एयरक्राफ्टमध्ये आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत नेटवर्कदरम्यान वापरता येणार आहे.
व्हिस्ता स्ट्रीममुळे प्रवाशांना विविध प्रकारचा कंटेंट थेट त्यांच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणावर उदा. स्मार्ट फोन, टॅब्लेट्स आणि लॅपटॉपवर वापरता येणार असून पर्यायाने मनोरंजनाचा सुखद अनुभव घेता येईल.
‘एयर इंडियाचे जागतिक दर्जाच्या विमानवाहतूक कंपनीमध्ये रुपांतर करत असतानाच व्हिस्ता स्ट्रीम सेवा उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे.
यामुळे आमच्या प्रवाशांना विमानप्रवासात आपल्या डिव्हाइसवर डिजिटल मनोरंजनाचा आनंद घोता येणार आहे. नॅरोबॉडी फ्लीटदरम्यान व्हिस्ता स्ट्रीम उपलब्ध करून देण्यात आली असून अखंड मनोरंजन (बीवायओडी) सेवा संपूर्ण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कदरम्यान उपलब्ध करण्यात येईल,’ असे एयर इंडियाचे प्रमुख कस्टमर एक्सपिरीयन्स अधिकारी राजेश डोग्रा म्हणाले.
प्रवाशांना बॉलिवूड ब्लॉकबस्टर्सपासून हॉलिवूड सिनेमा, माहितीपटांपासून क्लासिक ट्यून्सपर्यंत आणि लहान मुलांच्या कार्यक्रमांचा १६०० पेक्षा जास्त तासांचा प्रीमियम, क्युरेटेड कंटेंट पाहाता येणार आहे. व्हिस्ता स्ट्रीममध्ये रियल टाइम फ्लाइट ट्रॅकिंगसाठी लाइव्ह मॅप्स देण्यात आले असून ही सेवा आयओएस, अँड्रॉइड, विंडोज आणि मॅकओएस उपकरणावर उपलब्ध आहे.
पर्यायाने प्रवाशांना प्रवासात सहजपणे मनोरंजन सेवेचा आंद घेता येईल.


