Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedजमिनीची पत सुधारण्याकरिता गो आधारित शेती गरजेची : गोपाल सुतारिया राज्यस्तरीय गो...

जमिनीची पत सुधारण्याकरिता गो आधारित शेती गरजेची : गोपाल सुतारिया राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन आणि प्रशिक्षण नियोजन बैठक संपन्न ; महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने आयोजन

पुणे : देशी गोवंश वाचला, तर शेतकरी वाचेल आणि तरच देश वाचेल. रासायनिक खते किंवा कीटक नियंत्रक यांच्यापेक्षा अधिक गुणवत्तापूर्वक उत्पादन देशी गो वंश आधारित नैसर्गिक शेती मधून येते. गरज आहे ती याविषयी डोळसपणे प्रयत्न करण्याची. शेती वरील वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी, जमिनीची पत सुधारण्यासाठी आज लाखो शेतकरी यांनी गोकृपामृत वापरून शेती पर्यायाचा वापर केला आहे, असे बन्सी गीर गो शाळेचे प्रमुख गोपाल सुतारिया यांनी सांगितले.

महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन व महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण नियोजन बैठकीचे आयोजन पशुसंवर्धन आयुक्तालय येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशु संवर्धन विभागाचे आयुक्त डॉ प्रवीणकुमार देवरे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्राचे मुख्य संयोजक विजय वरुडकर, गोसेवा आयोगाच्या सदस्य सचिव मंजुषा पुंडलिक, गोसेवा आयोग सदस्य उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, मनीष वर्मा, गो कृषी तज्ञ तात्या मगर,ज्योत्स्ना वरुडकर, संजय भोसले, डॉ नितिन मार्कंडय, सनत गुप्ता आदी उपस्थित होते.

गो सेवा आयोग माध्यमातून गोमाता आधारित अशा १० वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रात काम सुरु आहे. गो आधारित शेती व गोपालन हे त्यातील महत्वाचे विषय आहेत. जमिनीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, ती सुधाकरण्याकरिता गो आधारित शेती करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले.

विजय वरुडकर म्हणाले, गो आधारित शेती किंवा नैसर्गिक शेती प्रशिक्षण, रासायनिक शेती आणि देशी गोवंश आधारित शेती याचा तुलनात्मक अभ्यास प्रशिक्षण, कामधेनु कृषी तंत्र, गोआधारित शेतीमधील विविध पद्धती, महाराष्ट्र गोहत्या बंदी अधिनियम माहिती यांसह गो आधारित कृषीतून सर्वांगीण ग्रामविकास, देशी गो वंशाचे नैसर्गिक शेतीतील आवश्यकता व महत्त्व गो आधारित शेतीतील यशोगाथा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील अनेक तालुक्यात नैसर्गिक शेती प्रशिक्षण नियोजन करण्यात येणार आहे. गो सेवा आयोग माध्यमातून डॉ. सुनील सूर्यवंशी जिल्हा निहाय गोशाळा यांचे प्रशिक्षण व नैसर्गिक शेती उत्पादन प्रशिक्षण विषयी आयोग सदस्य उद्धव नेरकर व विजय वरूडकर हे तालुका निहाय प्रशिक्षण सत्रांचे नियोजन करीत आहेत. या कार्यशाळा नोंदणी साठी ८४४६००४५८० या क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक समिती द्वारे करण्यात आले आहे. सारिका शेठ, संतोष सुरवसे, पौर्णिमा इनामदार, राहुल जगताप, विशाल वरूडकर, विक्रमादित्य शिंदे, गौरी शिलोनीकर, यांनी कार्यक्रम व्यवस्थापन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments