Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हॅन ह्युसनचा इव्हिनिंगवेअर विभागात प्रवेश स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी ‘व्हीएच इव्हिनिंग’ हा...

व्हॅन ह्युसनचा इव्हिनिंगवेअर विभागात प्रवेश स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी ‘व्हीएच इव्हिनिंग’ हा नवीन सबब्रॅण्ड ग्राहकांपुढे सादर

पुणे, 17 डिसेंबर 2024 : अव्वल दर्जाच्या फॉर्मल व वेडिंग वेअरसाठी दीर्घकाळापासून ओळखल्या जाणारा व्हॅन ह्युसन हा आदित्य बिर्ला फॅशन अँड रिलेटल लिमिटेडचा ब्रॅण्ड, ‘व्हीएच इव्हिनिंग’ या सबब्रॅण्डच्या (उपब्रॅण्ड) माध्यमातून एका नवीन प्रवर्गात प्रवेश करत आहे. संध्याकाळी घालण्याच्या वस्त्रांना नवा चेहरा देण्याच्या दृष्टीने ही नवोन्मेषकारी उत्पादश्रेणी विकसित करण्यात आली आहे. इव्हिनिंगवेअर या बोलक्या प्रवर्गात प्रवेश करणारी व्हीएच इव्हिनिंग पुरुष व स्त्रिया दोघांसाठी कपडे डिझाइन करत आहे, पारंपरिक ऑफिसवेअरहून वेगळे शैलीदार, ड्रेस्डअप (फॉर्मलवेअरहून वेगळे) कॅज्युअल्स या उत्पादनश्रेणीत आहेत. आफ्टर-अवर्स शैलीचा मेळ आधुनिकतेशी घालून हे कपडे तयार करण्यात आले आहेत. व्हीएच इव्हिनिंग ग्राहकांपुढे ठेवण्यातून, अव्वल दर्जाच्या कॅज्युअल व इव्हिनिंगवेअरमध्ये कलाप्रेरित फॅशन आणण्याप्रती, अभिजाततेचा मेळ ताज्या व बहुआयामी लूक्सशी घालण्याप्रती, व्हॅन ह्युसनची बांधिलकी दिसून येते.

उच्च दर्जाच्या फॉर्मल कपड्यांबाबत असलेल्या आपल्या लौकिकाच्या आणखी पुढे जात व्हॅन ह्युसनने व्हीएच इव्हिनिंगच्या माध्यमातून आधुनिक व्यावसायिकांच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या फॅशनविषय संवेदनशीलतेला प्रतिसाद दिला आहे. ‘कॅज्युअलायझेशन’चे प्रवाह सातत्याने क्षेत्राला नवीन आकार देत असल्यामुळे औपचारिकता व सहजसौंदर्य यांचा समतोल साधणाऱ्या पोशाखांना असलेली मागणी वाढत आहे. फॉर्मल व कॅज्युअल कपड्यांतील अंतर नाहीसे करणारे कपडे ग्राहकांना हवे आहेत. हा नवीन सबब्रॅण्ड इव्हिनिंगवेअर प्रवर्गातील कपडे ठळक व बोलक्या स्वरूपात प्रस्तुत करत आहे, स्त्री-पुरुषांना त्यांचा कामावर नसतानाचा लूक अधिक चांगला करण्याची संधी देण्याचा तसेच व्हॅन ह्युसनची ओळख असलेली सफाई व उत्कृष्टता कायम ठेवण्याचा या सबब्रॅण्डचा प्रयत्न आहे.

व्हॅन ह्युसनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (मुख्य कार्यपालन अधिकारी) श्री. अभय बहुगुणे या सबब्रॅण्डबद्दल म्हणाले, “व्हॅन ह्युसनच्या माध्यमातून आम्ही कायम बदलत्या ग्राहक पसंतीच्या पुढे राहण्यासाठी प्रयत्नशील असतो, व्हीएच इव्हिनिंग ही आमच्या बांधिलकीची पावती आहे. अभिजाततेशी कोणतीही तडजोड न करता ठळक अभिव्यक्तीला मुभा देणाऱ्या अभिरूचीपूर्ण इव्हिनिंगवेअरच्या क्षेत्रात बाजारपेठेत लक्षणीय तफावत असल्याचे आमच्या लक्षात आले. व्हीएच इव्हिनिंग ही मागणी तर पूर्ण करतेच पण व्यक्तीत्व, सफाई व वैविध्य यांचा अखंड संयोग साधणाऱ्या प्रवर्गाला नवीन ओळखही देते. व्यक्तींना आत्मविश्वासाने वेगळे उठून दिसण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने हा नवीन सबब्रॅण्ड डिझाइन करण्यात आला आहे, आधुनिक ग्राहकाची ओळख असलेली शैली व सघनता यांचा संयोग यामध्ये आहे.”

——————————————————————————————————————————————————————————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments