Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचे प्रकाशन*

व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचे प्रकाशन*

*‘

पुणे – सतराव्या ते एकोणिसाव्या शतकामध्ये भारतामध्ये अनेक चिंतक निर्माण झाले. या कालखंडाचा भारतातील प्रबोधन युग म्हणून विशेषत्वाने उल्लेख केला गेला आहे. प्रबोधन युगामध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा अनेक मान्यवरांनी समाजाचे जे प्रबोधन केले त्याचाच निचोड संघ कामाच्या रूपाने आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे असे प्रतिपादन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या मेळाव्यात ‘व्यवस्थापन शास्त्र व संघ’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. शरद कुंटे व प्रकाशक रविंद्र घाटपांडे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, एका अर्थाने समाजाच्या उत्कर्षासाठी सर्व महापुरुषांनी जो मार्ग दाखवून दिला त्याच मार्गाने संघाची वाटचाल निर्धाराने चालू आहे.
या पुस्तकात कार्यकर्त्याची जडणघडण, नेतृत्वगुणांचा विकास, समूहाने एखादा कार्यक्रम घडवून आणण्याचे तंत्र, आयोजनाचे तंत्र, नवीन कार्यक्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी संघटनेचा ठसा उमटवण्याची पद्धत व हे सर्व करत असताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण या प्रत्येक विषयामध्ये व्यवस्थापन शास्त्रातील अनेक तत्त्वांचा उपयोग केला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर चिल्लाळ यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments