Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभव्य रांगोळीतून विद्यार्थीनींंनी केला प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस साजरा पहिल्या महिला राष्ट्रपती...

भव्य रांगोळीतून विद्यार्थीनींंनी केला प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस साजरा पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा : श्री शिवाजी मराठी सोसायटीच्या जिजामाता मुलींच्या शाळेत आयोजन

पुणे: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त २५ बाय १५ फूट भव्य रांगोळी काढून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पहिल्या महिला राष्ट्रपती, भारताचा अभिमान, प्रतिभाताई पाटील तुमचे नाव, देशवासियांसाठी अजरामर गान…असे म्हणत विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्री शिवाजी मराठी सोसायटीच्या जिजामाता मुलींच्या शाळेमध्ये प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, जिल्हा परिषदेचे उप शिक्षण अधिकारी महिंद्रकर, विस्तार अधिकारी प्रणिती कुमावत, संस्थेचे सहसचिव विकास गोगावले, नियामक मंडळ अध्यक्ष कांचन सत्येंद्र, बि.एम. गायकवाड, रघुनंदन जाधव, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई, पद्माकर पवार उपस्थित होते. जिजामाता शाळेच्या मुख्याध्यापिका समिक्षा सांडभोर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

अण्णा थोरात म्हणाले, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. प्रतिभाताई पाटील यांच्या समाजसेवेची आणि नेतृत्वाची प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनीही समाजोपयोगी कार्य करावे आणि समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments