Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिप्सची मजा परत कोपा मॉलमध्ये, एका नव्या ट्विस्टसह

सिप्सची मजा परत कोपा मॉलमध्ये, एका नव्या ट्विस्टसह

पुणे, १९ डिसेंबर २०२४ – या वीकेंडला पुण्याचे अल्टीमेट लाइफस्टाइल डेस्टिनेशन कोपा मॉलने त्यांच्या लोकप्रिय कॉकटेल फेस्टिवल – सिप्स : कॉकटेल्स अँड लाइफस्टाइलचे ख्रिसमसच्या निमित्ताने परत एकदा आयोजन केले आहे. हे फेस्टिवल २१ आणि २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून त्यादरम्यान सिग्नेचर कॉकटेल, मौल्यवान खाद्यपदार्थ आणि लाइव्ह मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.

पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या लक्षणीय यशानंतर सिप्स परत एकदा पुण्यातलं फेस्टिवल सेलिब्रेशन आणखी खास करण्यासाठी परत येत आहे. या कार्यक्रमात १२ पेक्षा जास्त स्पिरीट ब्रँड्स आणि ५० हून अधिक कॉकटेल्स उपलब्ध असतील, ८ लाइव्ह म्युझिक सादर करत सुट्टीची मजा आणखी रंगतदार करतील. यावेळी मॉलला भेट देणाऱ्या पाहुण्यांना ट्रिव्हिया गेम्स, ड्रिंकिंग कॉन्टेस्ट आणि खास गेम झोनची मजा लुटता येईल तसेच थ्रिफ्ट शॉपिंगचा अनुभव घेता येईल. अबसोल्यूट, जिम बीम आणि बीयरफीटर अशा ब्रँड्सच्या मदतीने हा फेस्टिव्हल पहिल्यांदा येणारे तसेच त्याची आवड असणाऱ्यांनाही कॉकटेलचा अनोखा अनुभव देईल.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतातील आघाडीचे बारटेंडर्स एक्सक्लुसिव्ह गेस्ट शिफ्ट आयोजित करतील, ज्यामुळे पाहुण्यांना खास तयार केलेल्या ड्रिंक्सची चव घेण्याबरोबरच ती बनवण्याची प्रक्रिया शिकण्याची संधी मिळेल.

कोपा मॉलने कायमच नाविन्यपूर्ण व अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करत उच्च मापदंड प्रस्थापित केला आहे. तुम्ही कॉकटेलप्रेमी असाल किंवा फक्त सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी एक विशेष प्रसंग शोधत असाल, सिप्स ख्रिसमस एडिशन हा सीझन साजरा करण्यासाठी परफेक्ट आहे. म्हणूनच, या वीकेंडला कोपा मॉलला भेट द्या आणि जादुई ख्रिसमसचा आनंद घ्या.

स्थळ : कोपा मॉल

तारीख – शनीवार आणि रविवार, २१ – २२ डिसेंबर

वेळ – दुपारी तीननंतर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments