Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedअ‍ॅथलेटिक्समध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलला 63 पदके 09 सुवर्ण,26 रौप्य तर 28 कांस्यपदकांचे...

अ‍ॅथलेटिक्समध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलला 63 पदके 09 सुवर्ण,26 रौप्य तर 28 कांस्यपदकांचे ठरले मानकरी

पुणे, २० डिसेंबरः मुळशी जिल्हा परिषदेच्या वतिने तालुका शालेय क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स मैदानी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी १४, १७ व १९ वर्षे मुले व मुली या वयोगटात झाल्या. यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलला एकूण 63 पारितोषिके मिळाली. त्यापैकी 9 सुवर्ण, 26 रौप्य तर 28 कांस्यपदकांचे मानकरी ठरले.
अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा ४००मी, ६०० मी, ८०० मी, १५०० मी, ३००० मी तसेच लाँग जम्प सारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी दाखविलेली चपळता आणि जिद्द ही पदकांवरून सिद्ध होते. खेळाडूंच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल सकूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक धिरज घाडगे आणि ऋषिकेश पवार यांनी मार्गदर्शन केले.
१४ वर्षाखालील मुले: मध्ये पार्थ लांडे (६०० व ४०० मी, सुवर्णपदक) व (८० मी. अडथळा, रौप्य पदक), रूशील कौल (६०० व ४०० मी. रौप्य पदक), तरंग गुप्ता (२०० मी. रौप्य पदक), वीरेश नाईक (२०० मी. कांस्यपदक, १०० मी. रौप्य पदक आणि डिस्क थ्रो कांस्यपदक) तसेच ४ बाय १०० रिले संघात रौप्य पदक मिळाले. यामध्ये तरंग गुप्ता, वीरेश नाईक, पार्थ लांडे, रूशील कौल आणि कृष्णा बलवाड यांचा सहभाग होता.
१७ वर्षाखालील मुले:  मध्ये निमिष देशमुख (११० मी.अडथळा, सुवर्णपदक), सिद्धांत दिघे (तिहेरी उडी, सुवर्णपदक), देव विरमणी (डिस्क्स थ्रो, रौप्य पदक) आणि सिद्धार्थ गोवंडे (३००० मी. कांस्य पदक) त्याच प्रमाणे ४ बाय १०० रिले संघात कांस्य पदक मिळाले. यामध्ये निमिष देशमुख, गौतम नांबियार, निरवान पाटणकर, वेदांत देशमुख, सिद्धांत दिघे यांचा समावेश होता.
१९ वर्षाखालील मुले: मध्ये मितेश वाघ (३००० मी. सुवर्णपदक), युवराज पेद्राम (डिस्क थ्रो रौप्य पदक) आणि एशान पाटील (२०० मी. कांस्यपदक) तसेच ४ बाय १०० रिले संघात रौप्य पदकाचे मानकरी ठरले. यामध्ये ईशान पाटील, युवराज पेद्राम, अर्णव खानझोडे, सिद्धार्थ गोवंडे आणि मितेश वाघ यांचा समावेश होता. याचप्रमाणे ४ बाय ४०० मी. रिले संघात कांस्य पदक मिळाले. यामध्ये ईशान पाटील, युवराज पेद्राम, अर्णव खानझोडे, मितेश वाघ आणि नीरव ठोंबरे हे होते.
१४ वर्षाखालील मुलींच्या संघात  रीत पाल (६०० मी, सुवर्णपदक) व (४०० मी. रौप्य पदक), प्रिशा माने (६०० मी. कांस्यपदक व ४०० मी.मध्ये चौथे स्थान)
१७ वर्षाखालील मुलींच्या संघामध्ये रेवा चौगुले (३००० व १५०० मी. सुवर्ण पदक ), अनन्या मिस्त्री (१५०० मी. कांस्यपदक), तसेच ४ बाय ४०० मी. रिले संघात कांस्य पदक मिळाले. यामध्ये अनुश्री पिसाळ, रेवा चौगुले, अनन्या मिस्त्री, युविका परमार आणि अस्मी देशपांडे यांचा समावेश होता.
१९ वर्षाखालील मुलींच्या मॅरेथॉनमध्ये आराध्या तेलवाडकर (३००० मी. सुवर्ण) व (१५०० मी. रौप्य पदक), इवा मालवणकर (८०० मी. कांस्यपदक), अवंती किर्लोस्कर (४०० मी. रौप्यपदक व 100 मी.मध्ये चौथे स्थान), रीत दुबे (लॉग जम्प रौप्य पदक) आणि  दक्षा चोगटू (कांस्यपदक) तसेच ४ बाय ४०० रिले मध्ये रौप्य पदक मिळाले. यामध्ये अवंती किर्लोस्कर, ईवा मालवणकर, आराध्य तेलवाडकर, कांचन सिंग आणि प्रिशा माने यांचा समावेश होता. त्याच प्रमाणे ४ बाय १०० रिले संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यामध्ये रीत दुबे, दक्षा चोगटू, अवंती किर्लोस्कर, कांचन सिंग, आराध्य तेलवाडकर यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments