Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रोमाने केले सुपरर एक्स्चेंजचे अनावरण - तिप्पट फायद्यासाठी तुमच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक्सचा फायदा...

क्रोमाने केले सुपरर एक्स्चेंजचे अनावरण – तिप्पट फायद्यासाठी तुमच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक्सचा फायदा करून घ्या

नॅशनल, 23 डिसेंबर 2024: टाटा समूहाचा पाठिंबा असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स किरकोळ विक्रेता, क्रोमाने नवीन वर्षाच्या उत्सवाची सुरुवात करण्यासाठी त्यांच्या “Superrr Exchange”चे अनावरण केले! सुपरर एक्स्चेंज ग्राहकांना त्यांचे जुने इलेक्ट्रॉनिक्स अपग्रेड करणे सोपे करते, यासोबतच स्वच्छ, हरित भविष्यासाठी ते योगदान देते. ग्राहकांना नवीन, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणांसाठी त्यांच्या कालबाह्य गॅझेटची देवाण-घेवाण करण्यासाठी Superrr Exchange 21 डिसेंबर, 2024 पासून तिप्पट नियमित लाभ देते.

Superrr एक्स्चेंजअंतर्गत निवडक घरगुती उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विस्तृत श्रेणीची देवाण-घेवाण करणाऱ्या ग्राहकांना 3x एक्स्चेंज फायदे व अगदी नवीन उत्पादनांवर विशेष बक्षिसे आणि सूट मिळतील. याशिवाय, जुने लॅपटॉप आणि मोबाइलची देवाण-घेवाण करताना 21,000 रुपयांपर्यंतची बचत शक्य आहे.

या सार्वत्रिक विनिमय उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्राहक कोणतेही जुने उपकरण घेऊन जाऊ शकतात आणि कोणत्याही नवीन उत्पादनासह बाहेर पडू शकतात. होय, याचा अर्थ असा की, तुम्ही तुमचे न वापरलेले जुने ग्राइंडर बदलून नवीन स्मार्ट टीव्ही घेऊन बाहेर पडू शकता. इतकेच काय, यापुढे जी उपकरणे बंद पडली आहेत, त्यासाठीही ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही. अगदी 500 रुपयांच्या क्रोमा व्हाउचरच्या बदल्यात ते त्यांच्या जवळच्या क्रोमा स्टोअरमध्ये ती देऊन येऊ शकतात.

Superrr एक्स्चेंज देशभरातील सर्व 550+ क्रोमा स्टोअर्समध्ये लागू असेल. यामुळे देशाच्या प्रत्येक भागातील ग्राहकांना त्यांच्या जुन्या उपकरणांचा जबाबदारीने व्यवहार करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. प्रत्येक क्रोमा स्टोअरमध्ये एक डिस्पोजल क्षेत्र आहे, जेथे या उत्पादनांचे रीसायकल भागीदारांच्या साहाय्याने नैतिकरीत्या पुनर्नविनीकरण करण्यासाठी जुने इलेक्ट्रॉनिक्स गोळा केले जातात.

शिबाशिष रॉय, मुख्य कार्यकारी अधिकारी, Infiniti Retail Ltd. म्हणाले, “नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, Superrr Exchange नवीन सुरुवात करण्यास मदत करत आहे. जेव्हा लोक देवाण-घेवाणीचा लाभ घेतात, तेव्हा त्यांना केवळ नवीन उपकरणच मिळत नाहीत, तर ते जबाबदारीने खरेदी करण्याचा जाणीवपूर्वक विचार करू लागतात. राहण्यासाठी पृथ्वीला एक चांगले ठिकाण बनविण्यासाठी थोडेसे बदल आवश्यक आहेत, अशी ज्या लोकांची मान्यता आहे, त्या लोकांच्या वाढत्या चळवळीत आम्ही सहभागी होत आहोत.

इनस्टोअर प्रमोशन व्यतिरिक्त, क्रोमा सोशल मीडिया, जाहिराती आणि इतर लक्ष्यित आउटरीच मोहिमांद्वारे याची माहिती देईल. अपग्रेड आणि रीसायकल करणे अधिक फायद्याचे बनवून, सुपरर एक्स्चेंज आपल्या ग्राहकांप्रति, तसेच या ग्रहासाठी क्रोमाच्या वचनबद्धतेची पुष्टी करते आणि हे सिद्ध करते की, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये अपग्रेड करणे व पर्यावरणाची काळजी घेणे हे एकमेकांसोबत जाऊ शकते. सर्व जुन्या इलेक्ट्रॉनिक्सवर पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार पद्धतीने प्रक्रिया आणि पुनर्वापर केले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments