Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाई नामाच्या गजरात साई पालखी सोहळा उत्साहात श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेचा...

साई नामाच्या गजरात साई पालखी सोहळा उत्साहात श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेचा साई उत्सव २०२४ : विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : साईनामाचा गजर करीत…फुलांची उधळण, साईनामाचे भजन, आणि वाद्यांचा गजर यामुळे साईमय झालेल्या वातावरणात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत कर्वेनगर मधील श्री सद्गुरू साई बाबा सेवा संस्थेच्या वतीने आयोजित पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.

श्री सद्गुरू साई बाबा सेवा संस्थेच्या वतीने साई उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री साईबाबा पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. उत्सवाचे यंदा १६ वे वर्ष आहे.

यावेळी श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे, कुमार लांडे, वैभव नवसे, उमेश झेंडे, योगेश झेंडे, कैलास जाधव, विजय मोरे, साई धंगेकर, दिनेश गालफाडे, संदीप गवळी, विजय साळवे, अमोल शिंदे, राहुल ढमाले उपस्थित होते.

तुषार झेंडे म्हणाले, साई उत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साई मूर्तीचे मंगल स्नान, साई पादुकांची महापूजा व अभिषेक श्री साई सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद साईबाबांची सांज आरती व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे ते शिर्डी साईबाबा पालखीच्या पादुकांचे पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवाई चौक ते साई मंदिर असा पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी कोथरूड मधील श्री म्हातोबा भजनी मंडळ आणि बोपगाव मधील श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनी भजन सेवा दिली. उत्सवात मल्हार निर्मित ‘गर्जा हा महाराष्ट्र’ हा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाला. उत्सवा अंतर्गत ज्येष्ठ रक्तदाते सदाशिव कुंदेन यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments