डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त ‘कृष्णायन’ महा- समूहनाट्य सादर करण्यात आले.
शाला समिती अध्यक्ष डॉ. शरद
आगरखेडकर आणि मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेतून या महानाट्याची निर्मिती करण्यात आली. ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रवींद्र सातपुते यांनी दिग्दर्शन केले, जयंत टोले यांनी नेपथ्य केले.
कृष्णजन्म, पुतना वध,
कालिया मर्दन, गोवर्धनोदधरण, रासलीला, विश्वरूपदर्शन अशा कृष्ण जीवनातील रोमहर्षक
प्रसंगांचे भव्य नाट्य सादरीकरण पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.


