Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिस्सानकडून डिसेंबर महिन्यात सर्वोत्तम विक्रीची नोंदः एकूण ११६७६ गाड्यांची विक्री तर न्यू...

निस्सानकडून डिसेंबर महिन्यात सर्वोत्तम विक्रीची नोंदः एकूण ११६७६ गाड्यांची विक्री तर न्यू निस्सान मॅग्नाइटसाठीच्या बुकिंग्स १०,०००+ पार

• निस्सानकडून ऑक्टोबर २०२४ मध्ये न्यू निस्सान मॅग्नाइट एसयूव्हीसाठी १०,०००+ बुकिंग्सची नोंद.
• निस्सानकडून सीवाय२०२४ मध्ये ९१,१८४ गाड्यांची नोंद, डिसेंबर २०२४ मध्ये ११६७६ गाड्यांची नोंद. त्यामुळे ही कंपनीसाठी डिसेंबरमधली सर्वोत्तम कामगिरी ठरली.
• डिसेंबर २०२४ साठीची निर्यात ९५५८ गाड्या होती तर आर्थिक वर्ष२३ मध्ये ही निर्यात ५५६१ गाड्यांवर गेली. त्यामुळे वार्षिक वाढ ७२ टक्के ठरली.
• आर्थिक वर्ष २४ साठी वायटीडी निर्यात आकडेवारी ५१,७६४ गाड्या होती तर वायटीडी२३ मध्ये ती ३१,६६७ होती. ही वार्षिक वाढ ६३ टक्के आहे.

गुरूग्राम, ०१ जानेवारी २०२५: निस्सान मोटर इंडियाने वर्षाच्या सुरूवातीला घोषणा केली की त्यांनी या महिन्यात न्यू निस्सान मॅग्नाइट एसयूव्हीच्या बुकिंगचा १०,०००+ गाड्यांचा टप्पा पार केला असून या कॅलेंडर वर्षात (सीवाय) जानेवारी २४ पासून डिसेंबर २४ पर्यंत ९१,१८४ गाड्या विकल्या गेल्या. या महत्त्वाच्या टप्प्याबरोबरच डिसेंबर २०२४ मध्ये एकूण गाड्यांच्या होलसेल डिस्पॅचची संख्या ११६७६ पर्यंत गेली. त्यामुळे निस्सानच्या गाड्यांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे स्पष्ट झाले.

डिसेंबर २०२४ मध्ये एकूण निर्यात केलेल्या गाड्यांची संख्या ९५५८ होती तर देशांतर्गत विक्री झालेल्या गाड्यांची संख्या २११८ होती. डिसेंबर २४ मध्ये एकूण ९५५८ गाड्यांची झालेली निर्यात म्हणजेच डिसेंबर २३ मध्ये विकण्यात आलेल्या ५५६१ गाड्यांच्या तुलनेत वार्षिक स्तरावरील (वायओवाय) ७२ टक्के तर नोव्हेंबर २४ मध्ये विकल्या गेलेल्या ६६९८ गाड्यांच्या तुलनेत ही मासिक स्तरावरील (एमओएम) ही वाढ ४३ टक्के ठरली.

निर्यातीच्या कामगिरीत मोठी वाढ झाल्याचे दिसले. वायटीडी आर्थिक वर्ष २४ मधील निर्यातीची वाढ वायटीडी आर्थिक वर्ष २३ च्या तुलनेत ६३% झाली तर निर्यातीच्या गाड्यांमध्ये ७२% एमओएम वाढ झाल्याचे दिसले. ही सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी ग्राहकांमधील निस्सानच्या गाड्यांसाठीचा वाढता विश्वास आणि उत्साह दर्शवते.

निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ वत्स म्हणाले की,
“२०२४ हे वर्ष भारतात निस्सानसाठी एक आमूलाग्र बदलाचा टप्पा ठरले. आम्ही गाड्यांची डिलिव्हरी वेगाने केली आणि फोर्थ जनरेशन निस्सान एक्स-ट्रेल आणि न्यू निस्सान मॅग्नाइटसारख्या नवीन मॉडेल्स बाजारात आणल्या. डिसेंबरमध्ये झालेली ऐतिहासिक सर्वोत्तम विक्रीची कामगिरी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहकांनी आमच्या गाड्यांवर दाखवलेला सातत्यपूर्ण विश्वास आणि उत्साहाचे प्रतीक आहे. नाशिक आणि गोरखपूरमध्ये आम्ही नव्याने नेटवर्कचा विस्तार केला असून या आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत ३०० टचपॉइंट्स गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यातून देशभरात ग्राहकांपर्यंतची व्याप्ती आणि अनुभव विस्तारण्याचे आमचे ध्येय अधोरेखित होते.”

ते पुढे म्हणाले की: “आम्ही भारतातील आमचे डीलर्स, भागीदार आणि समभागधारक यांच्याप्रति कटिबद्ध आहोत आणि इंडिया टर्नअराऊंड प्लॅन अंमलात आणण्यासाठी सज्ज आहोत. या वेगाचा आम्ही ध्यास घेतला आहे आणि नववर्षात आमच्या ग्राहकांसाठी जास्तीत जास्त मूल्य देण्यासाठी सज्ज आहोत.”

भारतासाठी आपल्या विस्तार धोरणाचा भाग म्हणून निस्सान मोटर इंडियाने (एनएमआयपीएल) अलीकडेच आपले पहिलेवहिले अद्ययावत राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र- निस्सान अॅकेडमी, चेन्नईतील अलायन्स जेव्ही प्लान्टमध्ये सुरू केले आहे. ही अॅकेडमी निस्सानच्या देशभरातील डीलरशिपची तसेच सेवा कर्मचारी नेटवर्कची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी आणि अद्वितीय ग्राहक अनुभव देण्याच्या ब्रँडच्या ध्येयासाठी सज्ज आहे.

‘वन कार, वन वर्ल्ड’ची वाढती मागणी – आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मेड इन इंडिया न्यू निस्सान मॅग्नाइटमुळे निस्सानला ४५ पेक्षा नवीन बाजारपेठांमध्ये आपला निर्यातीचा पाया रचणे शक्य झाले आहे. त्यामुळे ही कंपनी ६५ पेक्षा अधिक देशांमध्ये आपली व्याप्ती वाढवेल. त्यात नव्याने येणाऱ्या लेफ्ट हँड ड्राइव्ह (एलएचडी) बाजारपेठांचाही समावेश आहे.

आपल्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ या तत्वज्ञानावर काम करताना निस्सान मोटर इंडियाने आपल्या नव्याने बाजारात आलेल्या एसयूव्ही, न्यू निस्सान मॅग्नाइटची निर्यात दक्षिण आफ्रिकेला करण्यास सुरूवात केली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात न्यू निस्सान मॅग्नाइटच्या अनावरणादरम्यान केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने कंपनीने चेन्नईतील निस्सानच्या अलायन्स जेव्ही प्लाटन्मधून आपली नवीन गाडी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आणली. नवीन निस्सान मॅग्नाइटची निर्यात होणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला देश ठरला.

भारतात न्यू मॅग्नाइट एसयूव्हीचे आंतरराष्ट्रीय अनावरण झाल्यानंतर एकाच महिन्यात २७०० पेक्षा जास्त गाड्या चेन्नई कारखान्यातून बाहेर पाठवण्यात आल्या आहेत. निस्सान मॅग्नाइट ही गाडी निस्सानच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर दि वर्ल्ड’ स्वप्नाचे प्रतीक आहे. आतापर्यंत एकूण १५०,०००+ गाड्या विकल्या गेल्या आहेत आणि डिसेंबर २०२० मध्ये अनावरण झाल्यापासून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या गाडीने आपला प्रभावी ठसा उमटवला आहे.

हा महत्त्वाचा टप्पा निस्सानसाठी भारताचे एक महत्त्वाचे निर्यात केंद्र म्हणून स्थान प्रस्थापित करतो. न्यू निस्सान मॅग्नाइटमध्ये बोल्ड, आतून-बाहेरून स्टायलिश डिझाइन्स असून त्यात २०+ पहिल्या आणि वर्गातील सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि ५५+ एकूण सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments