Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्लिपकार्टचा सर्व्हिस विभाग असलेल्या एफ-१ इन्फो सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेसकडून मुंबईत गूगल पिक्सेलसाठी...

फ्लिपकार्टचा सर्व्हिस विभाग असलेल्या एफ-१ इन्फो सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेसकडून मुंबईत गूगल पिक्सेलसाठी तिसऱ्या विशेष सेवा केंद्राचे अनावरण, सहा शहरांमध्ये एकाच दिवसात फोन दुरूस्तीच्या सेवा उपलब्ध होणार

फ्लिपकार्टचा सर्व्हिस विभाग असलेल्या एफ-१ इन्फो सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेसकडून मुंबईत गूगल पिक्सेलसाठी तिसऱ्या विशेष सेवा केंद्राचे अनावरण, सहा शहरांमध्ये एकाच दिवसात फोन दुरूस्तीच्या सेवा उपलब्ध होणार

● वांद्रे कुर्ला संकुलातील विशेष सेवा केंद्रातून गूगल पिक्सेल वापरकर्त्यांना आपल्या अनेक तांत्रिक समस्यांसाठी एकाच दिवसात दुरूस्ती सेवा उपलब्ध होईल.

● एफ-१ सेवांनी मुंबईत तिसऱ्या विशेष सेवा केंद्राचे अनावरण करून गूगलसोबतची आपली भागीदारी मजबूत केली आहे. बंगळुरू आणि दिल्लीमध्ये दोन केंद्रे अस्तित्वात असून लखनौ, गुरगाव, कोचीन, चेन्नई, पुणे आणि कोलकात्यात सहा एकाच दिवसात दुरूस्ती सेवा केंद्रांची स्थापना; भारतातील ३५०+ मल्टीब्रँड सेवा केंद्रांद्वारे खरेदीनंतरच्या सेवा उपलब्ध.

 

बंगळुरू- 8 जानेवारी २०२५: फ्लिपकार्टचा सर्व्हिस विभाग असलेल्या एफ-१ इन्फो सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने गूगलच्या सहयोगाने अलीकडेच मुंबईत तिसऱ्या विशेष सेवा केंद्राची स्थापना केली. या वर्षाच्या सुरूवातीला एफ-१ सर्व्हिसेसने बंगळुरू आणि दिल्लीमध्ये दोन विशेष केंद्रांची स्थापना केली. या अद्ययावत सेवा केंद्रातून भारतात उपलब्ध असलेल्या पिक्सेल मोबाइल आणि घड्याळे, बड्स फिटबिट, नेस्ट आणि वेअरेबल्स तसेच इतर भारतात उपलब्ध असलेल्या गूगल उत्पादनांसाठी वेगवान आणि उत्तम दर्जाच्या सेवा देऊन ग्राहकांच्या अनुभव समृद्ध केला जाईल. उत्पादन ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा कोणत्याही प्रकारे खरेदी केले असले तरी सुलभ वॉक इन सपोर्ट आणि त्याच दिवशी डिलिव्हरी देण्यात येईल.

या सहयोगाचा भाग म्हणून एफ-१ सर्व्हिसेस भारतात गूगल पिक्सेल उपकरणांसाठी गूगलचा विशेष विक्रीनंतरचा सेवा पुरवठादार म्हणून कार्यरत आहे. मुंबईत नव्याने सुरू झालेले सर्व्हिस सेंटर स्क्रीन आणि बॅटरी बदलण्याच्या अनेक तांत्रिक समस्यांसाठी त्याच दिवशी दुरूस्ती देते.

या सहयोगाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत:

● गूगल पिक्सेल उत्पादनांसाठी आफ्टर सेल्स सेवा सहज उपलब्ध: वॉरंटीत असलेल्या आणि नसलेल्या गूगल पिक्सेल उत्पादनांसाठी एफ-१ सर्व्हिसेस विविध प्रकारच्या सेवा देते. त्यातून गूगल पिक्सेल वापरकर्त्यांना भारतात तसेच परदेशात खरेदी केलेल्या उत्पादनांसाठी कार्यक्षम आणि विश्वासू आफ्टर सेल्स सेवा मिळतील याची काळजी घेतली जाते. एफ-१ सर्व्हिसेसची भारतभरात ३५० पेक्षा अधिक मल्टीब्रँड केंद्रे असून त्यांच्या पिकअप आणि ड्रॉप सेवा त्याच दिवशी दुरूस्तीच्या सोयीला पूरक ठरतात.

● विश्वासू जोडीदार: एफ-१ सर्व्हिसेस हा मागील अनेक वर्षांत गूगलचा विश्वासू भागीदार राहिला आहे. त्यांनी उत्तम दर्जाच्या आफ्टर सेल्स सेवा दिल्या आहेत. या सहयोगामुळे भारतात आगळ्यावेगळ्या प्रकारच्या विशेष सेवा केंद्रांची स्थापना झाली आहे. मुंबई केंद्राची भर पडल्यामुळे कंपनीची नावीन्यपूर्णता आणि कार्यान्वयन सर्वोत्तमतेद्वारे अद्वितीय ग्राहक सेवा देण्याप्रति वचनबद्धता अधोरेखित होते.

● प्रशिक्षण आणि सेवा सर्वोत्तमता: आपला उद्योगातील आघाडीचा दर्जा कायम राखण्यासाठी एफ-१ सर्व्हिसेसकडून आपल्या तंत्रज्ञांना दर महिन्याला तांत्रिक प्रशिक्षण तर ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची हाताळणी सुलभफणे होते आणि त्यावर सहज उपाय निघतात. तसेच उत्तम दर्जाचा आणि ग्राहक केंद्री अनुभव देण्याची कंपनीची कटिबद्धता दिसून येते.

 

गूगल हार्डवेअरसाठी जागतिक सेवा आणि लॉजिस्टिक पार्टनरशिप्सचे प्रमुख प्रेम पांडियन म्हणाले की, “भारतात गूगल पिक्सेल पोर्टफोलिओचा वापर जास्तीत जास्त होऊ लागला आहे. आम्ही आमची उत्पादने वाढवत आहोत आणि आमच्या वापरकर्त्यांना सर्वोत्तम आफ्टरसेल्स सेवा अनुभव मिळेल याची काळजी घेत आहोत. आमच्या एफ-१ इन्फो सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेससोबतच्या भागीदारीमार्फत आम्ही मुंबईत आमच्या सेवा नेटवर्कचा विस्तार करत आहोत. अनेक तांत्रिक समस्यांसाठी एकाच दिवसात दुरूस्ती मिळेल आणि पिक्सेलच्या वापरकर्त्यांना एक चांगला आणि उत्तम दर्जाचा सपोर्ट अनुभव मिळेल याची काळजी घेतली जात आहे. हे भारतीय बाजारपेठेप्रति आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक असून आम्ही अद्वितीय ग्राहक सेवा देण्यासाठी कायम उत्सुक आहोत.”

 

या नवीन अनावरणाबाबत बोलताना जीव्ह्स आणि एफ-१ इन्फो सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेसचे प्रमुख नितीन भान म्हणाले की, “गूगल उत्पादनांच्या वापरातील वाढ हे आमच्या भारतातील ग्राहकांसाठी आफ्टर सेल्स अनुभवांमध्ये वाढ करण्याच्या एकत्रित स्वप्नांचे फलित आहे. गूगलकडून या विशेष सेवा केंद्रांचे उद्घाटन गूगल हार्डवेअर टीमच्या आपल्या ग्राहकांसोबत अर्थपूर्ण सहयोगावर भर देते आणि त्यांना त्यांच्या गूगल पिक्सेल उपकरणांसाठी सर्वोत्तम सेवा व सहकार्य मिळेल याची काळजी घेतली जाते. मुंबईतील विशेष सेवा केंद्राचे अनावरण आणि त्याच दिवशी दुरूस्ती बिझनेस सेवांच्या विस्तारामुळे नावीन्यपूर्ण आणि ग्राहक केंद्री उपाययोजना देण्याच्या आमच्या वचनबद्धता अधोरेखित झाल्या आहेत. वेग, सुलभता आणि उत्तम दर्जाच्या सेवा एकत्र आणून एफ-१ इन्फो सोल्यूशन्स अँड सर्व्हिसेस आफ्टर सेल्स केअरची नव्याने व्याख्या करत आहे आणि भारतात एंड टू एंड आफ्टर सेल्स सेवांसाठी एक विश्वासू भागीदार म्हणून आमचे स्थान मजबूत करत आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments