Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedन्यू इंग्लिश स्कूलमध्ये नायलॉन मांजाची होळी*

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नायलॉन मांजाची होळी*

पतंग उंच उडावा यासाठी नायलॉन किंवा चायनीज सिंथेटिक मांजाचा वापर करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेने परिसरात प्रबोधन फेरीचे आयोजन करून प्रतिकात्मक मांजाची सार्वजनिक होळी केली.

मकर संक्रांत सण जवळ आला की नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात. हा पतंग उंच उडावा यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. पतंग काटाकाटीच्या स्पर्धेत कापलेला मांजा विजेचे खांब, इमारतींचे रेलिंग किंवा झाडांमध्ये अडकतो. परिणामी दरवर्षी तो नागरिकांसाठी अपघाताचे आणि हजारो पक्षांसाठी मृत्यूचे कारण ठरतो. त्यामुळे नायलॉन, प्लास्टिक, काच, धातूचा चुरा आणि विविध रसायने लावलेला धोकादायक मांजा वापरू नये, असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईडच्या दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापिका सुनीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, प्रवीण रांगोळे, हनुमंत तोडकर, विकास पढेर, पूनम पाटील यांनी संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments