Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedवारी एनर्जीचा नवा उपक्रम, ग्रामीण शाळेला सौर यंत्रणा भेट

वारी एनर्जीचा नवा उपक्रम, ग्रामीण शाळेला सौर यंत्रणा भेट

एकलारा गाव, बुलढाणा, 15 जानेवारी २०२४ – वारी एनर्जीज लि. या भारतातील सर्वात मोठ्या सौर पीव्ही मोड्युल उत्पादक कंपनीने ग्रामीण शिक्षणाचे भवितव्य उजळविण्यासाठी एकलारा, बनोडा येथील श्रीसंत कोटेश्वर महाराज विद्यालयाला अत्याधुनिक सौरऊर्जा यंत्रणा भेट दिली आहे. हा उपक्रम कंपनीच्या पर्यावरणासह शैक्षणिक क्षेत्राशी मेळ घालण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

या यंत्रणेमुळे गावातील शाळेला अखंड वीजपुरवठा होणार असून, ही निव्वळ एक अद्ययावत पायाभूत सुविधा नाही, तर ग्रामीण भारतासाठी शाश्वत विकासाची आशा आहे. या यंत्रणेमुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना तुटक वीजपुरवठ्याला तोंड न देता, शिक्षण घेता येणार असून, यामुळे दुर्गम भागात शैक्षणिक सुविधांचे नवे मापदंड प्रस्थापित होणार आहेत.

या उपक्रमाविषयी वारी एनर्जीज लिमिटेडचे प्रमुख सस्टेनिबिलीट अधिकारी (सीएसओ) प्रभू नारायण सिंग म्हणाले, ‘या सौर यंत्रणेतून आमची ग्रामीण शिक्षण क्षेत्रात शाश्वत नावीन्याद्वारे क्रांती आणण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. शाळांना हरित ऊर्जेसह सक्षम करत, आम्ही वर्ग प्रकाशमान करत आहोत, शिवाय पर्यावरण जपण्याची भावना भावी पिढीमध्ये रुजवत आहोत. या दुहेरी प्रभावामुळे वारीचे देशभरात उज्ज्वल, अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्याचे ध्येय आणखी बळकट झाले आहे.’

हा प्रकल्प वारीच्या विस्तृत सामाजिक उपक्रमांशी सुसंगत असून, कवानी, बिकानेरमध्ये अशाच प्रकारचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या ठिकाणी ५,००० वंचित मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपण मोहीमही राबविण्यात आली. भारतातील सर्वात मोठी सौर पीव्ही मोड्युल उत्पादक आणि १३.३ GW एकत्रित इन्स्टॉल्ड क्षमता यांसह वारीने व्यावसायिक गुणवत्ता व सामाजिक जबाबदारीचा मेळ घालण्यात उदाहरणासह आदर्श निर्माण केला आहे.

या सौरऊर्जा यंत्रणेमुळे शाळेचा विजेवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून, तो निधी इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरता येईल व विद्यार्थ्यांना अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देता येईल. या उपक्रमातून वारीची शाश्वत समाज तयार करण्याची आणि दरम्यान भारताच्या ऊर्जा स्थित्यंतराच्या गरजा पूर्ण करण्याची बांधिलकी दिसून आली आहे. कॉर्पोरेट लीडरशिप कशा प्रकारे तळागाळात दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक प्रभाव घडवून आणू शकते, हे या उदाहरणातून दिसून आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments