Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरकाम मदतनीस महिला* कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा आरोग्य शिबिर २६ जानेवारीला. नांदेड सिटीत संपन्न

घरकाम मदतनीस महिला* कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा आरोग्य शिबिर २६ जानेवारीला. नांदेड सिटीत संपन्न

🚩🚩🚩
*नांदेड सिटीत सेवा उपक्रम* म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर *जन्म त्रि शताब्दी* निमित्त *घरकाम मदतनीस महिला* कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा आरोग्य शिबिर २६ जानेवारीला आसावरी क्लब हौऊस येथे झाले
कार्यक्रमाचे आयोजन *भारतीय स्त्री शक्ती, नांदेड सिटी*, *आसावरी गृहरचना संस्था मर्यादित* आणि *डॉक्टर्स असोसिएशन, नांदेड सिटी* तसेच रक्त नमुने *जनकल्याण रक्त पेढी* यांच्या संयुक्त सहकार्याने झाले

शिबिराचे उदघाटन : *डॉ अनिल दुधभाते*,यांच्या हस्ते भारतमाता पूजनाने झाले.

*नांदेड सिटी रेसिडेंट डॉकटर्स असोसिएशन* च्या, डॉक्टर टीमच्या सहकार्याने *हा उपक्रम झाला त्यात डॉ सुनीता जंगले, डॉ ऋषिकेश दामले, डॉ वैशाली गोसावी, डॉ अपेक्षा रणधीरे, डॉ वैशाली गोमसाळे, डॉ सुप्रिया दामले, डॉ मोनाली शिंदे – रावडे यांचा सहभाग होता*
एकंदर *६५ महिला कामगारांची* वैद्यकीय तपासणी आणि सल्ला तसेच त्यांना काही औषधे मोफत देण्याची व्यवस्था शिबीरात करण्यात आली.
शिबीरास काही मान्यवर डॉक्टरांनीही भेट दिली त्यात
१ ) *डॉ विकास क्षिरसागर* सातारा येथील *छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय* मध्ये सहाय्यक अध्यापक
२ ) *डॉ प्रमोद धायगुडे* निवृत्त पुणे मनपा आरोग्य अधिकारी
३ ) *डॉ मुकेश कसबेकर* आरोग्य भारती समन्वयक महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात प्रमुख
४) *श्री राहुल देशमुख*, खजिनदार आसावरी सोसायटी,
कार्यक्रमाचे नियोजन नांदेड सिटी मातृशक्ती कार्यकर्ते: *सौ अर्चना कौलगुड, सौ वृषाली दीक्षित, सौ रेणुका काळे* तसेच जेष्ठ कार्यकर्ते : *मिलिंद दीक्षित, प्रकाश गोरे, दयाराम जोशी*
*हे शिबीर आसावरी सहकारी गृहरचना अध्यक्ष श्री रुपेश घुले आणि सचिव ॲड गजानन पाडळकर तसेच सर्व कार्यकारीणीच्या सहकार्याने पार पडले*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments