भारतभरात स्कोडाच्या पहिल्या एस-४-मीटर एसयूव्हीच्या डिलिव्हरीजना सुरूवात
सब-४-मीटर एसयूव्हीचे पदार्पण: कायलॅक भारतातील सर्वात स्पर्धात्मक एसयूव्ही श्रेणीमधील स्कोडाच्या प्रवेशाला दर्शवते, या कारमध्ये ब्रँडची नवीन मॉडर्न सॉलिड डिझाइन शैली आहे
हाय-परफॉर्मन्स, कार्यक्षम आणि विश्वसनीय पॉवरट्रेन: १.० टीएसआय (८५ केडब्ल्यू, १७८ एनएम) सह दोन ट्रान्समिशन पर्याय – सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक
इंधन कार्यक्षम: मॅन्युअल व्हेरिएण्टमध्ये १९.६८ किमी/लीटरची एआरएआय प्रमाणित इंधन कार्यक्षमता
व्यापक व्हेरिएण्ट श्रेणी: किंमत ७.८९ लाख रूपयांपासून सुरू होते, चार ट्रिम लेव्हल्स – क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ आणि प्रेस्टिज
सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार: भारत एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग. सर्व व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित सहा एअरबॅग्ज आणि २५ हून अधिक प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्ये
मुंबई, २७ जानेवारी २०२५ – स्कोडा ऑटो इंडियाची पहिलीच सब-४-मीटर एसयूव्ही कायलॅक भारतात अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे, जो ब्रँडसाठी मोठा टप्पा ठरला आहे. या लाँचसह कायलॅकने भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या एसयूव्ही बाजारपेठेत स्कोडासाठी नवीन क्षमता खुल्या केल्या आहेत. ही उच्च मागणी असलेल्या सब-४-मीटर सेगमेंटमधील ब्रँडची पहिली ऑफरिंग आणि भारतातील पहिली मॉडेल आहे, जिच्यामध्ये स्कोडाची नवीन मॉडर्न सॉलिड डिझाइन शैली, प्रबळता, कार्यक्षमता आणि विश्वसनीयता आहेत. आजपासून ग्राहकांसाठी डिलिव्हरीज व टेस्ट ड्राइव्ह्ज सुरू होत आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”कायलॅक अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे आणि आगामी वर्षांमध्ये भारतातील स्कोडाच्या विकासगतीला चालना देण्यास सज्ज आहे. आजपासून या कारची उपलब्धता स्कोडा ऑटो इंडियासाठी न्यू एराला सादर करते. या कारमध्ये सुरक्षितता, अपवादात्मक ड्रायव्हिंग गतीशीलता आणि सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्ये आहेत. कुशक व स्लाव्हियाला मिळालेल्या यशानंतर कायलॅकने आमचे भारत-केंद्रित उत्पादन धोरण कायम ठेवले आहे, ज्यामुळे आम्हाला नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास आणि स्कोडा कुटुंबामध्ये अधिकाधिक ग्राहकांना आणण्यास मदत होत आहे. कारच्या किफायतशीर दरासह आम्ही सांगू शकतो की, कायलॅक निश्चितच भारतातील रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करते.”
कायलॅकला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्पर्धात्मक सब-४-मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील या कारच्या प्रबळ अपीलसह स्कोडा ऑटो इंडियाला प्रबळ विक्री गती संपादित करण्याचा विश्वास आहे. कंपनीने २०२६ पर्यंत १ लाख वार्षिक विक्रीचा टप्पा गाठण्याचे ध्येय स्थापित केले आहे, ज्याला कायलॅकची सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्ये, अपवादात्मक सुरक्षितता मापदंड आणि भारतातील रस्त्यांसाठी युरोपियन तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे, जे ग्राहकांशी संलग्न आहे. हा धोरणात्मक फोकस स्कोडा ऑटो इंडियाच्या फूटप्रिंट वाढवण्याप्रती आणि देशभरातील अधिकाधिक ग्राहकांना प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशन्स देण्याप्रतीच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे.
बीएनसीएपी येथे ५-स्टार प्रमाणित
स्कोडा कायलॅकने सुरक्षिततेमध्ये मापदंड स्थापित केला आहे, जेथे आयसीई सब-४-मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वोत्तम परफॉर्मिंग वेईकल ठरली आहे. या कारने अडल्ट ऑक्यूपण्ट प्रोटेक्शनमध्ये ३२ पैकी ३०.८८ पॉइण्ट्स (९७ टक्के) आणि चाइल्ड ऑक्यूपण्ट प्रोटेक्शनमध्ये ४९ पैकी ४५ पॉइण्ट्स (९२ टक्के) मिळवले. मुलांच्या सुरक्षिततेसाठी कायलॅकला फ्रण्टल ऑफसेट बॅरियर टेस्टमध्ये १६ पैकी १६ पॉइण्ट्स (१०० टक्के) आणि दीड ते तीन वर्षाच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी साइड-मूव्हिंग डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये संपूर्ण ८ पॉइण्ट्स (१०० टक्के) मिळाले. तसेच, कायलॅकला शिफारस केलेल्या चाइल्ड सीट मूल्यांकनामध्ये देखील सर्वाधिक पॉइण्ट्स आणि वेईकल-आधारित मूल्यांकनामध्ये १३ पैकी ९ पॉइण्ट्स (६९ टक्के) मिळाले, ज्यामधून स्कोडाची सर्व निकषांमध्ये सुरक्षिततेप्रती कटिबद्धता दिसून येते.
सर्वोत्तम वैशिष्ट्ये
कायलॅकमध्ये विविध सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये आहेत, जसे ड्रायव्हर व पुढील आसनावरील प्रवाशासाठी व्हेंटिलेशनसह सिक्स-वे इलेक्ट्रॉनिक सीट्स. पार्सल ट्रेसाठी समर्पित स्टोविंग स्पेस बूटची उपयुक्तता आणि वैविध्यतेमध्ये वाढ करते. कायलॅकचे बूट स्पेस सेगमेंटमधील सर्वोत्तम ४४६ लीटर क्षमता देते, जी मागील सीट्स फोल्ड केल्यानंतर १,२६५ लीटरपर्यंत वाढू शकते. या कारमध्ये ऑटो क्लायमेट्रॉनिकसह इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससाठी व्हेंटिलेशन आहे. निवडक व्हेरिएण्ट्स देखील इलेक्ट्रिक सनरूफसह उपलब्ध आहे. तसेच, या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, स्टीअरिंग-माऊंटेड पॅड-शिफ्टर्ससह सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, लेदरेट सीट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्पल कारप्ले आणि वायरलेस चार्जिंग अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. खास आकर्षण आहे २५.६ सेमी इन्फोटेन्मेंट स्क्रिनसह अधिक सर्वोत्तम युजर इंटरफेस, तसेच ड्रायव्हरसाठी नवीन इंटरफेससह २०.३२ सेमी व्हर्च्युअल कॉकपीट आहे.
मॉडर्न सॉलिड: प्रचलित स्कोडा लाइन्सचे नवीन वर्णन
नवीन मॉडर्न सॅॉलिड डिझाइन शैलीचा अवलंब करणारी भारतातील पहिली स्कोडा मॉडेल कायलॅकच्या एक्स्टीरिअरमध्ये विशिष्ट आकार व सुस्पष्ट लाइन्स आहे. पुढील बाजूला चमकदार ब्लॅक ग्रिलसह ३डी राइब्स आहे, तसेच हॉलमार्क स्कोडा एसयूव्ही ‘फोर आइज’ हेडलाइट्स ग्राफिकला पूर्णत: नवीन लुक देण्यात आला आहे. कायलॅक मागील बाजूस ऑल-न्यू स्कोडा वर्डमार्क असलेली भारतातील पहिली मॉडेल देखील आहे. याव्यतिरिक्त, पुढील बाजूस अॅल्युमिनिअम ऑप्टिक्समध्ये नवीन आकर्षक फ्रण्ट लोअर स्पॉयलर आहे.
अचूक दिवसा चालणारे लॅम्प सिग्नेचर
मॉडर्न सॉलिड युगासह हेडलाइट्समध्ये स्लिम लाइन्स आणि किमान, उद्देशपूर्ण डिझाइन आहे. हेडलाइट्सचे अरूंद अपर सेगमेंट्स दिवसा चालणाऱ्या लाइट्स, पोझीशन लाइट्स व इंटीकेटर्स म्हणून कार्यरत राहतात, तर मोठे लोअर मॉड्यूल्स महत्त्वपूर्ण लो-बीम व हाय बीम फंक्शन्ससह क्रिस्टालाइन डिझाइन केलेले एलईडी घटक देतात.
कॉम्पॅक्ट डायनॅमिक सिल्हूट
कायलॅकच्या साइड्सना सुस्पष्ट व आधुनिक लाइन्ससह सजवण्यात आले आहे. या कारमध्ये व्हील आर्क्स व सिल्सच्या भोवती प्रबळ क्लॅडिंग आहे, जे व्हीलभोवती असलेले उच्च ग्राऊंड क्लीअरन्स व स्पेसला साजेसे आहे. यामधून कायलॅकला कॉम्पॅक्ट आकारमानांसह एसयूव्ही विशिष्टता मिळाली आहे. तसेच कायलॅकच्या डिझाइनमध्ये अधिक भर करणारे वैशिष्ट्य म्हणजे षटकोनी पॅटर्नसह कारची साइड व रिअर.
मजबूत प्रमाण, आकर्षक रंग
स्कोडा कायलॅक ५ मिमी लांब, १,७८३ मिमी रूंद आणि १,६१९ मिमी उंच असण्यासह व्हीलबेस २,५६६ मिमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायलॅकमध्ये १८९ मिमी ग्राऊंड क्लीअरन्स आहे. या कॉम्पॅक्ट, पण आकर्षक प्रमाणांना मागील बाजूपासून पूर्ण करण्यात आले असून व्यापक ब्लॅक स्टाइपवरील ऑन-न्यू स्कोडा वर्डमार्क रिअल लाइट्समधून चमकते. रिअर लॅम्प्समधून विशिष्ट टी-आकाराचे लाइट सिग्नेचर दिसून येते. याला पूरक विशिष्ट रिअर बम्पर आहे, जे अॅल्युमिनिअम ऑप्टिक्समधून ३डी डिफ्यूजर इन्सर्टसह सुसज्ज आहे. कायलॅक सात पेंट फिनिशेसमध्ये उपलब्ध आहे आणि कायलॅकमध्ये ऑलिव्ह गोल्ड या नवीन रंगाची भर करण्यात आली आहे. हा रंग कायलॅकसाठी विशेष आहे आणि पावसाळ्यादरम्यान लोणावळ्याच्या संपन्न हिरवळ व वैविध्यपूर्ण प्रजातींपासून प्रेरित आहे.
शक्तीसह कार्यक्षमता आणि सुरक्षितता
कायलॅक मॅन्युअल ट्रान्समिशनसह १०.५ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते. या एसयूव्हीची अव्वल गती १८८ किमी/तास आहे. या कारमधील १.० टीएसआय इंजिन ८५ केडब्ल्यू शक्ती आणि १७८ एनएम टॉर्कची निर्मिती करते. हे इंजिन निवडक व्हेरिएण्ट्समधील पॅडल शिफ्टर्ससह सिक्स-स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह डिझाइन करण्यात आले आहे. कार कुशक व स्लाव्हियाप्रमाणे त्याच एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या दोन कार्सना प्रौढ व्यक्ती व मुलांसाठी ग्लोबल एनसीएपी चाचण्यांमध्ये संपूर्ण ५-स्टार मिळाले आहेत. कायलॅकमध्ये प्रमाणित म्हणून २५ हून अधिक अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी वैशिष्ट्यांसह प्रमाणित इक्विपमेंट आहे, ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज, ट्रॅक्शन व स्टेबिलिटी कंट्रोल, अॅण्टी-लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, ब्रेक डिस्क वाइपिंग, रोल ओव्हर प्रोटेक्शन, मोटर स्लिप रेगुलेशन, इलेक्ट्रॉनिक डिफरेन्शियल लॉक, पॅसेंजर एअरबॅग डि-अॅक्टिव्हेशन, मल्टी कोलिजन ब्रेकिंग, ISOFIX चाइल्ड सीट्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. मॅन्युअल व्हेरिएण्ट १९.६८ किमी/लीटरची इंधन कार्यक्षमता देते.
चंद्रावर जाऊन परत येण्याइतक्या अंतरापर्यंत चाचणी
कायलॅकची भारतातील विविध प्रदेशांसह शहरातील रस्ते, महामार्ग, तीव्र चढण असलेले रस्ते आणि खडतर रस्त्यांवर ८००,००० किमीहून अधिक अंतरापर्यंत चाचणी करण्यात आली आहे, जे चंद्रावर जाऊन परत येण्याच्या अंतरापेक्षा जास्त असण्यासोबत संपूर्ण पृथ्वीला २० वेळा परिभ्रमण करण्याइतके आहे. या ऑल-न्यू सब-४-मीटर सेगमेंट एसयूव्हीची -१० ते +८५ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानामध्ये आणि समुद्रपातळी ते समुद्रपातळीपासून ३,००० मीटर उंच चढणीपर्यंत चाचणी करण्यात आली आहे. पावसाळ्यादरम्यान सुसज्जता आणि घटकांपासून परिपूर्ण सीलिंगच्या खात्रीसाठी कायलॅकचे १०० रँडम सॅम्पल्स जवळपास १६ अंश कोनामध्ये प्रति चौरस मीटर प्रति मिनिट २५ ते ३० लीटर पाण्यामध्ये एक्स्पोज करण्यात आले आहेत. कायलॅकची वेईकल शेकर टेस्ट देखील करण्यात आली आहे, ज्यामधून सर्व रस्त्यांवर आतील भाग शांतमय व स्थिर राहण्याची खात्री मिळते. उच्च दर्जाच्या मापदंडाच्या खात्रीसाठी सर्व पॉलिमेरिक पार्टसची चाचणी करण्याकरिता कारला दोन वर्ष खुल्या वातावरणामध्ये देखील ठेवण्यात आले आहे.
सर्वोत्तम क्वॉलिटी
कायलॅकच्या उत्पादन प्रक्रियांमध्ये अनेक क्वॉलिटी उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामधून दर्जात्मक सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग गतीशीलतेची खात्री मिळते. रूफ व इतर जॉइण्ट्स लेझर-ब्लेझ आहेत, कायलॅकची रचना रोबोटाइज आहे, दोन ठिकाणी चेसिसचे इनलाइन मापन करण्यात आले आहे आणि असेम्ब्ली लाइनवरील एआय कॅमेरे इंजिन पृष्ठभागावरील बदल आणि असातत्यतेवर देखरेख ठेवतात. वापरण्यात आलेले हॉट-स्टॅम्प स्टील, तसेच पुनर्रचना करण्यात आलेली क्रॅश मॅनेजमेंट सिस्टम कायलॅकमध्ये सर्वोत्तम सुरक्षिततेची खात्री देतात.
सर्वसमावेशक पर्याय
स्कोडा कायलॅक व्यापक पर्याय देते, ज्यामध्ये दोन ट्रान्समिशन पर्याय, चार व्हेरिएण्ट्स आणि सात रंगांचा समावेश आहे. या कारमधील हाय-परफॉर्मन्स, कार्यक्षम व विश्वसनीय १.० टीएसआय इंजिन ८५ केडब्ल्यू शक्ती आणि १७८ एनएम टॉर्क देते. ही कार सिक्स-स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ग्राहक क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ व प्रेस्टिज या चार व्हेरिएण्ट्समधून आणि टोर्नेडो रेड, ब्रिलिएण्ट सिल्व्हर, कँडी व्हाइट, कार्बन स्टील, लावा ब्ल्यू, डीप ब्लॅक व कायलॅक एक्सक्लुसिव्ह ऑलिव्ह गोल्ड या सात रंगांमधून निवड करू शकतात.
उत्साहवर्धक मालकीहक्क अनुभवासाठी व्हेरिएण्ट्स
एण्ट्री-लेव्हल क्लासिक व्हेरिएण्टमध्ये सहा एअरबॅग्ज आणि प्रमाणित म्हणून २५ हून अधिक अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी वैशिष्ट्ये असण्यासोबत ईएससी, एलईडी लायटिंग, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि ऑटोमॅटिक स्पीड-सेन्सिटिव्ह सेंट्रल लॉकिंग आहे. सिग्नेचर व्हेरिएण्टनी आपला स्तर उंचावला आहे, ज्यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल’, १७.७ सेमी इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि अॅडजस्टेबल रिअर एसी व्हेण्ट्स आहेत. सिग्नेचर+ मध्ये वायरलेस अँड्रॉईड ऑटो/अॅप्पल कारप्ले, मोठी २५.६ सेमी इन्फोटेन्मेंट सिस्टम् आणि व्हर्च्युअल कॉकपीट आहे. टॉप-ऑफ-द-लाइन प्रेस्टिजमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅडल शिफ्टर्स आणि सेगमेंट-फर्स्ट सिक्स-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
सेगमेंट-बेस्ट मालकीहक्क
कायलॅक प्रमाणित वॉरंटी म्हणून ३-वर्ष / १००,००० किमी (जे अगोदर असेल ते) देते. यासोबत, ही कार रेंजमध्ये प्रमाणित म्हणून सहा-वर्षांच्या अॅण्टी-कोरशन वॉरंटीसह येते. कुशक व स्लाव्हियाप्रमाणे ही एसयूव्ही देखील एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. भारतातील व झेक रिपब्लिकमधील टीम्सनी संयुक्तपणे ही कार विकसित केली आहे, जेथे मेन्टेनन्स खर्च कमी करण्यावर आणि स्कोडाचे गतीशीलता व सुरक्षिततेचे पारंपारिक गुण कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
शाश्वत उत्पादन
कायलॅक चाकण प्लांट येथे उत्पादित करण्यात आली आहे, जेथे ३० टक्के (१८.५ मेगावॅट) ऊर्जा सौरऊर्जेमधून निर्माण केली जाते. स्कोडाचा हे प्रमाण २०२६ पर्यंत ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा मनसुबा आहे. हे वॉटर-पॉझिटिव्ह केंद्र वापरापेक्षा पर्यावरणामध्ये अधिक पाणी परत करते. ६६०,००० हून अधिक झाडे लावण्यासह या प्लांटने झीरो वेस्ट टू लँडफिल आणि झीरो लिक्विड डिस्चार्ज सर्टिफिकेशन्स मिळवले आहेत. कायलॅकमध्ये शाश्वत बांबू-फायबरयुक्त पॅडचा वापर करण्यात आला आहे, तसेच टेक्स्टाइल फिनिश डॅशबोर्ड जागेत सर्वोत्तम इफेक्ट निर्माण करते.


