Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहेश आयडॉल सीझन १३ स्पर्धा रविवारी (दि.९) महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल...

महेश आयडॉल सीझन १३ स्पर्धा रविवारी (दि.९) महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन ; देशभरातून ७५ माहेश्वरी युवक -युवतींचा सहभाग

पुणे : माहेश्वरी समाजातील प्रतिभावान तरुण व्यक्तिमत्त्वांना समाजासमोर आणून त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखत प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महेश आयडॉल २०२४-२५ सीझन १३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून ७५ युवक-युवतींचा यामध्ये सहभाग असून ही स्पर्धा रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कोथरूडमधील एमआयटी संस्थेच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती सीए मनोज मालपाणी आणि निहार लढ्ढा पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला फोरम चे श्रुती करनानी, सीए विमल करनानी, रोहित मोहता, प्रिती मालपाणी, शितल भट्टड, जुगल तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

सीए मनोज मालपाणी म्हणाले, महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्ट ही माहेश्वरी तरुण – तरुणींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी संस्था आहे. पुण्यातील सर्व १५ माहेश्वरी प्रोफेशनल फोरम चॅप्टरने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माहेश्वरी युवक – युवतींनी वैयक्तिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे मूल्यमापन यामध्ये केले जाते. कार्यक्रमाकरिता कुशल टेक्नॉलॉजीचे ललिता करवा, बाळकृष्ण करवा, स्किन शुअर क्लिनिकच्या रश्मी सोनी-लोहिया आणि इनोटेक ऑटो इंडिया प्रा. लि. चे नीरज मंत्री यांनी विशेष सहकार्य केले आहे.

निहार लढ्ढा म्हणाले, वयवर्षे २५ ते ४५ या वयोगटातील युवक युवती यामध्ये सहभागी होतात. विविध प्रश्न विचारण्यासोबतच त्यांच्यातील कौशल्यगुण देखील जाणून घेतले जातात. स्पर्धकांमधील विविध गुणांचे मूल्यांकन परीक्षक आणि उपस्थित प्रेक्षक करून विजेत्याला महेश आयडॉल हा किताब दिला जातो. यंदाच्या वर्षी भारतातून ७५ अर्ज आले होते. त्यातील १० जणांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. त्यातील प्रथम तीन क्रमाकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन तसेच अंतिम विजेत्याला महेश आयडॉल हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

——————————————————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments