Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सने लॉजिस्टिक्‍स सर्वोत्तमतेप्रती मोरे ट्रान्‍सपोर्टचा प्रवास सक्षम केला

टाटा मोटर्सने लॉजिस्टिक्‍स सर्वोत्तमतेप्रती मोरे ट्रान्‍सपोर्टचा प्रवास सक्षम केला

पुणे, २० फेब्रवारी २०२५: गेल्या दशकभरात प्रगतीपथावर आरूढ आहे आणि २०२६ पर्यंत देश जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनण्याची अपेक्षा आहे. उद्योग अहवालांनुसार, याचे प्रमुख श्रेय शहरीकरण, वाढते मध्‍यमवर्ग गट आणि वाढते खर्च करण्यायोग्य उत्पन्‍न यांना जाते. ई-कॉमर्स आणि गतीशील व्यापाराचा जलद विस्तार या वाढीला आणखी गती देत आहे, ज्यामुळे मजबूत लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व मागणी निर्माण होत आहे. व्यावसायिक वाहने या परिवर्तनाचा आधारस्‍तंभ म्हणून काम करतात, ज्यामुळे देशभरात मालांची विनासायास व विश्‍वसनीय वाहतूकीची खात्री मिळते.

संपन्‍न औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र पुणे शहर वेगाने विकसित होत आहे. शहराच्या लॉजिस्टिक्स गरजा पूर्ण करण्यात मोरे ट्रान्सपोर्ट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही कंपनी स्थिरता, दूरदष्‍टी आणि सर्वोत्तमप्रती कटिबद्धतेचे प्रतीक आहे. टाटा मोटर्स एलपीटी ९०९ ट्रकसह सुरुवात करून मोरे ट्रान्सपोर्ट १२५ टाटा मोटर्स वाहनांच्या ताफ्यासह प्रगतीशील लॉजिस्टिक्स व्यवसाय बनला आहे. या उल्‍लेखनीय प्रवासामधून टाटा मोटर्सवर दाखवलेला विश्‍वास आणि कंपनीचे संस्थापक श्री. शंकर मोरे यांची उद्योजकीय भावना दिसून येते, ज्यांनी कंपनीच्या यशाचा मजबूत पाया रचला.

कंपनीची विकसित व अवलंबनाची क्षमता २०१७ मध्‍ये अधिक प्रबळ झाली, जेथे श्री. शंकर मोरे यांचा मुलगा हृषिकेश सेकंड-जनरेशन उद्योजक म्‍हणून व्‍यवसायामध्‍ये सामील झाले. बदलत्या परिस्थितीची सखोल समज आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन बाळगून हृषिकेश यांनी टाटा मोटर्ससोबत सहयोगाने ताफ्याचा विस्तार केला आणि विकासाचा नवीन टप्पा गाठला. त्यांच्या दूरदृष्टीसह कार्यकाळाच्‍या पहिल्याच वर्षात आठ नवीन टाटा ट्रकची भर करण्‍यात आली, ज्यामुळे मोरे ट्रान्सपोर्टला ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करता आल्या आणि आपले कामकाज प्रभावीपणे वाढवता आले. विश्‍वसनीय एलपीटी १९२१ आणि एलपीटी २८२१ खरेदी करणारी ही पुण्यातील पहिली कंपनी ठरली. त्यांच्या उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि विश्‍वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या वेईकल्‍सनी मोरे ट्रान्सपोर्टला आव्हानात्मक लॉजिस्टिक सेवा देण्यास सक्षम केले आहे.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत मोरे ट्रान्‍सपोर्टचे मालक श्री. शंकर कुंडलिक मोरे म्‍हणाले, “टाटा मोटर्स आमच्‍या यशोगाथेला आकार देण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिली आहे. आमच्‍या व्‍यवसाय गरजांबाबत त्‍यांना असलेली सखोल समज, तसेच कामगिरी सानुकूल व कार्यक्षमता वाढवणारे सोल्‍यूशन्‍स बहुमूल्‍य राहिले आहेत. बदलत्‍या गरजांची पूर्तता करणाऱ्या त्‍यांच्‍या विश्‍वसनीय सोल्‍यूशन्‍सपासून कंपनीच्‍या प्रबळ विक्री-पश्‍चात्त सपोर्टपर्यंत टाटा मोटर्सने आम्‍हाला अवलंब, विकास करण्‍यास आणि आमच्‍या कटिबद्धतेचे पालन करण्‍यास सक्षम केले आहे. आम्‍ही हा सहयोग पुढे सुरू ठेवण्‍यास आणि सहयोगाने मोठे टप्‍पे गाठण्‍यास उत्‍सुक आहोत.”

टाटा मोटर्सने मोरे ट्रान्‍सपोर्टच्‍या लीडरशीपच्‍या पहिल्‍या व दुसऱ्या पिढीसोबत सहयोगाने काम केले आहे, तसेच बदलत्‍या काळाशी जुळवून घेत सोल्‍यूशन्‍स देत आहे, जे सर्वसमावेशक उद्योग गतीशीलता आणि ग्राहक गरजांची पूर्तता करतात. या सहयोगामधून ग्राहकांना सक्षम करण्‍याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता दिसून येते, तसेच नाविन्‍यता, विश्‍वास आणि उद्योजकता दृष्टिकोन झपाट्याने विकसित होत असलेल्‍या लॉजिस्टिक्‍स क्षेत्रात यशाला गती देऊ शकतात हे देखील निदर्शनास येते. प्रबळ कार्यरत फोकस आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासह मोरे ट्रान्‍सपोर्ट सर्वोत्तमतेचे नवीन मापदंड स्‍थापित करण्‍यास उत्तमरित्‍या सज्‍ज आहे, ज्‍यामधून उत्‍पादक व ग्राहकांमध्‍ये विनासायास कनेक्‍टीव्‍हीटीची खात्री मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments