भारतातील स्कोडा ऑटोची २५ वर्षे आणि त्यांच्या न्यू एराच्या शुभारंभाला साजरे करत आहे
न्यू एरा. न्यू स्ट्रॅटेजी: ग्राहक-केंद्रित मोहिमा आणि ‘ब्रँड सुपरस्टार’सह भारतातील नवीन बाजारपेठांमध्ये ब्रँडच्या प्रवेशाला गती देण्यासाठी सहयोग करण्यात आला
महत्त्वाकांक्षी, धमाल व मनोरंजनपूर्ण असलेल्या स्कोडा कार्समधून प्रेरणा घेण्यात आली आहे आणि हे गुण पॉवरहाऊस रणवीर सिंगशी संलग्न आहेत
मुंबई, २० फेब्रुवारी २०२५ – आपली पहिली सब-४-मीटर एसयूव्ही कायलॅक लाँच केल्यानंतर स्कोडा ऑटो इंडियाने आणखी एक टप्पा संपादित केला आहे, जेथे आपला पहिला ‘ब्रँड सुपरस्टार’ म्हणून पॉवरहाऊस रणवीर सिंगची घोषणा केली आहे. हा सहयोग सिग्नेचर, स्कोडा स्टाइल, ग्राहक-केंद्रित मोहिमांशी संलग्न आहे, ज्यांना स्कोडा ऑटा इंडियाचे चाहते व ग्राहकांसाठी रणवीर सिंगने अधिक उत्साहित केले आहे.
या सहयोगाबाबत मत व्यक्त स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”कायलॅक लाँच केल्यानंतर मी सांगितले होते की ‘पिक्चर अभी बाकी है’. आम्ही भारतात २५ वर्षे साजरी करत असताना येथे न्यू एराचा शुभारंभ करण्याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे जागतिक दर्जाची उत्पादने लाँच करण्यात येतील. या उपक्रमांतर्गत व्यवसायाच्या प्रत्येक पैलूमध्ये, तसेच ग्राहक व चाहत्यांशी संलग्न होण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल. जगभरात आणि भारतात कार्स व चित्रपट भावना जागृत करतात, ज्या अद्वितीय असतात आणि लोकांना एकत्र आणतात. म्हणून भारतातील आमच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मला स्कोडा ऑटो इंडियासाठी पहिला ‘ब्रँड सुपरस्टार’ म्हणून रणवीर सिंगची घोषणा करण्याचा अभिमान वाटत आहे. पडद्यावर व पडद्यामागे टॅलेंट व ऊर्जेचा पॉवरहाऊस रणवीरच्या व्यक्तिमत्त्वामधून आमची आवड आणि तत्त्व दिसून येतात. आम्ही जागतिक सर्वोत्तमतेची १३० वर्षे साजरी करत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. या सहयोगांतर्गत आमची उत्पादने, आमचे नेटवर्क आणि ग्राहकांसाठी अनेक गोष्टी सादर केल्या जाणार आहेत, जेथे आम्ही युरोपबाहेर स्कोडासाठी सर्वात महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून आमचे स्थान अधिक प्रबळ करण्यास उत्सुक आहोत.”
ब्रँड सुपरस्टार असलेला स्कोडा ऑटो इंडियाचा पहिला ब्लॉकबस्टर लवकरच प्रीमियर होणार आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग कायलॅकसोबत पाहायला मिळेल. यानंतर मार्चच्या अखेरपर्यंत ब्रँड-केंद्रित जाहिरात सादर करण्यात येणार आहे, ज्यामधून चाहते व ग्राहकांना या वर्षाच्या उत्तरार्धात रणवीर सिंग आणि स्कोडा ऑटो इंडियाच्या मॅनेजमेंटला भेटण्याची संधी मिळेल.
स्कोडा ऑटो इंडियासाठी पहिले ब्रँड सुपरस्टार रणवीर सिंग म्हणाले, ”मला स्कोडा ऑटो इंडियाचा पहिला ब्रँड सुपरस्टार बनण्याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून सर्वोत्तमतेप्रती समान कटिबद्धता दिसून येते आणि मी भारतात स्कोडा ऑटोच्या विकासाप्रती योगदान देण्यास उत्सुक आहे. स्कोडा ऑटोचा वैविध्यपूर्ण व उत्साहवर्धक उत्पादन पोर्टफोलिओ आहे, जो भारतातील वाढत्या बाजारपेठेमधील ऑटोमोटिव्ह उत्साही आणि व्यापक ग्राहकवर्गाच्या गरजांची पूर्तता करतो. प्रबळ वारसा आणि उत्पादनांच्या आयकॉनिक श्रेणीसह ब्रँड ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये उच्च मापदंड स्थापित करत आहे.”
जेव्हा सुपरस्टार सुपरस्टारला भेटतो
स्कोडा ऑटो इंडिया आणि रणवीर सिंग यांच्यामधील सहयोग स्वाभाविक आहे, जेथे त्याची ऊर्जा, उत्साही व डायनॅमिक व्यक्तिमत्त्वामधून स्कोडा ऑटो इंडियाच्या फन-टू-ड्राइव्ह आणि मनोरंजनपूर्ण कार्स परिपूर्णपणे दिसून येतात. दोघेही सुरक्षित, विश्वासार्ह आणि त्यांच्या कलेमध्ये सर्वोत्तम आहेत, ज्यामधून परिपूर्ण समन्वय निर्माण होतो. स्कोडा ऑटो इंडियासाठी हा सहयोग सिग्नचेर, स्कोडा स्टाइल, ग्राहक-केंद्रित मोहिमांच्या माध्यमातून ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
भावी विकासाला चालना
स्कोडा ऑटो इंडिया आणि रणवीर सिंग यांच्यामधील सहयोग या डायनॅमिक ऑटोमोटिव्ह बाजारपेठेसाठी नियोजित केलेल्या कंपनीच्या विकास धोरणाशी संलग्न आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये स्कोडा ऑटो इंडियाने जगभरातील व भारतातील आपल्या आयसीई व ईव्ही वेईकल्सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ दाखवला. ब्रँडने आपल्या जागतिक पोर्टफोलिओमधील एलरॉक व एनयाक ईव्ही, कोडियक लक्झरी ४x४, उच्च कार्यक्षम ऑक्टाव्हिया व्हीआरएस व सुपर्ब लक्झरी सेदान अशा कार्सना, तसेच एमवाय २०२५ कुशक आणि ऑल-न्यू कायलॅकचे प्रदर्शन दाखवले. स्कोडा ऑटो इंडियाने कायलॅकच्या डिलिव्हरींना सुरूवात केली. बॉलिवुडचा पॉवरहाऊस रणवीर सिंगसोबतचा हा नवीन सहयोग या न्यू एराला चालना देत आहे.
भारत युरोपबाहेर स्कोडा ऑटोसाठी सर्वात महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे आणि कंपनीची २०२६ पर्यंत दरवर्षाला १००,००० कार्सची विक्री करण्याची योजना आहे. भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये दाखवण्यात आलेल्या सर्व मॉडेल्सनी भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण बाजारपेठेसाठी नाविन्यतेसह युरोपियन डिझाइन आणि कार्यक्षमता वितरित करण्यावर लक्ष केंद्रित केले. या उत्पादनांमधील तंत्रज्ञान व डिझाइन भारतातील ब्रँडच्या अधिक विस्तारीकरणासाठी आणि स्कोडा ऑटो इंडिया कुटुंबामध्ये नवीन ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नासाठी महत्त्वाचे आहेत. ब्रँड सध्याच्या २७७ सेल्स व सर्विस टचपॉइण्ट्सच्या माध्यमातून आपली पोहोच देखील वाढवणाार आहे आणि २०२५ च्या अखेरपर्यंत ३५० टचपॉइण्ट्सचे लक्ष्य आहे. व्यवसाय निष्पत्तींना चालना देण्यामध्ये सर्व उपाययोजनांसोबत रणवीर सिंग यांच्या स्वरूपात पहिला ब्रँड सुपरस्टार न्यू एरा वितरित करेल, जे स्कोडा ऑटोने भारतात नियोजन केले आहे.
ब्लॉकबस्टर अलर्ट: पॉवरहाऊस रणवीर सिंग बनला स्कोडा ऑटो इंडियाचा पहिला ‘ब्रँड सुपरस्टार’
RELATED ARTICLES


