Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedLauritz Knudsen Electrical and Automation (पूर्वीचे L&T Switchgear) तर्फे Elecrama 2025 मध्ये...

Lauritz Knudsen Electrical and Automation (पूर्वीचे L&T Switchgear) तर्फे Elecrama 2025 मध्ये स्विचगियर आणि ऑटोमेशन सोल्यूशन्सच्या संपूर्ण पोर्टफोलिओचे अनावरण

नवीन ब्रँड ओळखीसह ELECRAMA मध्ये प्रभावी पदार्पण

· जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल शोमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या उत्पादन आणि उपायसुविधा पोर्टफोलिओचे प्रदर्शन

· ‘विकसित भारत’ संकल्पनेसाठी असलेल्या बांधिलकीसह उद्योग, पायाभूत सुविधा, रिटेल, घरे आणि शेती यांना ऊर्जा मिळवून देण्याचे उद्दिष्ट

25 फेब्रुवारी, नवी दिल्ली, भारत: भारतीय इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य Lauritz Knudsen Electrical and Automation (पूर्वी L&T Switchgear म्हणून ओळखले जाणारी) कंपनीने ELECRAMA 2025 मध्ये आपल्या नवीन ब्रँड ओळखीअंतर्गत प्रभावी पदार्पण केले. कंपनीने उद्योग, पायाभूत सुविधा, रिटेल, घरे आणि शेतीसाठी प्रगत उत्पादनांची आणि उपाय सुविधांची श्रेणी सादर केली. ‘विकसित भारत’ या सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून Lauritz Knudsen विविध उपयोजनांसाठी उपयुक्त उपाय सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करून भारतातील आपल्या कंपनीच्या उत्पादन आणि संशोधन विकास क्षमता वाढवण्याच्या योजना जाहीर केल्या.

भारताच्या विकास आणि नाविन्यपूर्णता याप्रती असलेल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून Lauritz Knudsen ने ELECRAMA 2025 मध्ये विविध क्रांतिकारी उपाय सुविधांचे दर्शन घडविले. या सुविधा देशाच्या ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. कंपनीचा मुख्य भर डिजिटलायझेशन आणि ऊर्जा कार्यक्षमतेद्वारे भारताच्या परिवर्तनाला गती देण्यावर आहे.

सादर करण्यात आलेली मुख्य उत्पादने आणि उपाय सुविधा:

· Omega UZ ACB – Lauritz Knudsen चा डिजिटल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्म SmartComm मध्ये सहज सामावून जाण्यासाठी Ethernet I/P, Bluetooth आणि NFC सारख्या संवाद तंत्रज्ञानासह एकत्रितपणे उच्च दर्जाच्या स्विचिंग आणि संरक्षण कार्यक्षमतेसह सुसज्ज सर्वात प्रगत एअर सर्किट ब्रेकर.

· Dsine DZ MCCB – अक्षय ऊर्जा गरजांसाठी डिझाइन केलेले समग्र मोल्डेड केस सर्किट ब्रेकर्स, ऑप्टिमाइझ्ड सिस्टम कोऑर्डिनेशन आणि तसेच डिजिटल सिस्टम इंटिग्रेशनसाठी मॉड्युलर डिजिटल ट्रिप युनिट्स आणि अॅक्सेसरीजसह उच्च क्षमतेच्या शॉर्ट सर्किट ब्रेकिंग क्षमता

· नवीन औद्योगिक ऑटोमेशन सोल्यूशन्स – वेगवेगळ्या प्रक्रिया ऑटोमेशन आणि कार्यक्षमतेत सुधारणा करता यामध्ये व्हेरिएबल फ्रिक्वेंसी मोटर ड्राईव्ह्स, PLCs आणि SmartComm सह एकत्रित केलेले HMIs चा समावेश आहे.

· enConnect होम ऑटोमेशन सोल्यूशन्स – क्लाउड-आधारित “enConnect” IoT प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित कनेक्टेड होम अनुभवासाठी वायरलेस Wi-Fi स्विचेस, लाइटिंग आणि कर्टन कंट्रोल सोल्यूशन्सची नवीन श्रेणी.

· नवीन संख्यात्मक संरक्षण रिले श्रेणी – LV आणि MV उपयोजनांसाठी संपूर्ण संरक्षण, नियंत्रण आणि संज्ञापन कार्यक्षमतेसह सुसज्ज, तसेच अधिक सुरक्षिततेसाठी ड्रॉ-आउट डिझाइन.

· पूर्ण EV इकोसिस्टम – इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये सुलभ करण्यासाठी EV चार्जर्स, SmartComm चार्ज मॅनेजमेंट सिस्टम (CMS) आणि क्लाउड-आधारित ग्राहक अॅप्सचा समावेश

· शेती ऑटोमेशन सोल्यूशन्स – डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशनद्वारे उत्पन्न आणि जलसंवर्धन वाढवणारी नाविन्यपूर्ण, स्मार्ट सिंचन व्यवस्थापन प्रणाली.

Schneider Electric India चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रेटर इंडियाचे झोन प्रेसिडेंट दीपक शर्मा म्हणाले, “भारत जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्या इलेक्ट्रिकल आणि डिजिटल पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही भारतात नाविन्यपूर्णता आणि संशोधन विकास उत्कृष्टतेला प्राधान्य देत असून, उत्पादन क्षमता वाढवणे आणि कार्यक्षमतेत वाढ करणे हे आमचे ध्येय आहे. हा गुंतवणूक प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या वाढीस हातभार लावण्याच्या तसेच देशाच्या विविधांगी ग्राहक गरजा पुरविण्यासाठी आपल्या क्षमता मजबूत करण्यासाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा भाग आहे.”

Lauritz Knudsen चे सीओओ नरेश कुमार म्हणाले, “2030 पर्यंत भारताचे 7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य लक्षात घेता विश्वासार्ह, कार्यक्षम आणि शाश्वत इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित होते. ELECRAMA 2025 मध्ये आम्ही सध्याच्या आणि भविष्यातील बाजाराच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करत आहोत. भारतात खोलवर रुजलेल्या ग्राहकांना सेवा मिळेल हे सुनिश्चित करत मोठे उद्योग आणि मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून लहान किरकोळ विक्रेते आणि शेतकऱ्यांपर्यंत विस्तारलेल्या ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्या आमच्या विस्तृत उत्पादन श्रेणीमधून आमचे सर्वसमावेशक वाढीवरील लक्ष केंद्रित करणे स्पष्ट होते.”

Lauritz Knudsen चा भारतभर मजबूत विस्तार असून विविध भौगोलिक ठिकाणी कार्यक्षम सेवा सुविधा वितरण सुनिश्चित करत त्यामध्ये 500 हून अधिक शहरांमध्ये 33 हून अधिक कार्यालयांसह उत्पादन सुविधा केंद्रे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments