मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, रमणबाग प्रशालेत साहित्यिक ओळखा आणि साहित्यकृती सांगा, हा उपक्रम करण्यात आला.
विविध साहित्यिकांचे मुखवटे घातलेली मुले विद्यार्थ्यांसमोर आली, समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची नावे आणि निवडक साहित्य कृती सांगितल्या.
पालक सीमा मराठे यांनी वि. वा. शिरवाडकर यांची, ‘वीज म्हणाली धरतीला’ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
तर तनय नाझिरकर या विद्यार्थ्याने मराठी गौरव गीत आणि माय मराठी हे उपरोधक गीत कार्यक्रमात सादर केले.
या दोन्ही गीतांची रचना मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई यांनी केली असून मराठी भाषेच्या गौरवा बरोबरच, मराठी बोलताना बाळगायची सतर्कता, त्यातून मांडली आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या विविध नऊ स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी झाले.
मराठी विषय प्रमुख ऋचा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन शुभांगी पाखरे यांनी केले.
बक्षीसपात्र ९० विद्यार्थ्यांच्या आणि १० शिक्षकांच्या यादीचे वाचन, अर्चना देवळणकर यांनी केले. तर सूत्रसंचालन, सुहास देशपांडे यांनी केले.
रमणबागेत रंगला साहित्यिक ओळखा उपक्रम
RELATED ARTICLES


