Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedदांडेकर संस्कृत नाट्यस्पर्धेचा समारोप उत्साहात संपन्न*

दांडेकर संस्कृत नाट्यस्पर्धेचा समारोप उत्साहात संपन्न*

*

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय,(संस्कृत विभाग) आयोजित डॉ. रा.ना. दांडेकर संस्कृत नाट्यस्पर्धेचा त्रिदिवसीय कार्यक्रम (रविवार – २ मार्च) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या त्रिदिवसीय कार्यक्रमात तब्बल ८ शालेय तर ९ महाविद्यालयीन संघांनी अभूतपूर्व सहभाग घेतला.
त्यात शालेय गटात *(सांघिक प्रथम)- अहिल्यादेवी कन्या विद्यालय ( परोपकारार्थं इदं शरीरम्)*,
*नवआंग्ल विद्यालय – मम श्रेष्ठतम: नायक: ( सांघिक द्वितीय)* आणि
*गोळवलकर गुरुजी विद्यालय – ऋतुकलह: ( सांघिक तृतीय)* अशी बक्षिसे मिळवली.
तर महाविद्यालयीन गटातून, *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – हे भगवन् ( प्रथम)*,
*नाशिकचे हं.प्रा.ठा. महाविद्यालय – चम्पुहरणम् ( द्वितीय)* ,
*फर्ग्युसन महाविद्यालय – अस्ति कश्चित् भावविशेषः ( तृतीय)*,
*डेक्कन महाविद्यालय – धीयतां ते नटराजरंगम् ( उत्तेजनार्थ)*, हे संघ बक्षिसपात्र ठरले.
त्याचप्रमाणे शाळांना प्रोत्साहनपर आणि महाविद्यालयांना अभिनय,दिग्दर्शन,नेपथ्य इ. विशेष पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून फर्ग्युसन कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ.राधिका जाधव,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृत भारतीचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. शिरीष भेडसगावकर उपस्थित होते.तसेच स्पर्धेच्या प्रणेत्या डॉ. मंगला मिरासदार आणि स्पर्धेचे परीक्षक ही उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून या भव्य कार्यक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व सहभागी संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे आयोजक म्हणून संस्कृत विभाग प्रमुख प्रा.अंकित रावल यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.स्पर्धेचे सूत्रसंचालन पंकज पवार यांनी केले.

तसेच स.प.महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांनी अतीशय सुरेल अशी संगीतप्रस्तुती करून कार्यक्रम सुरमय केला.

रसिकप्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments