Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसर्वच क्षेत्रात सुरक्षेची आवश्यकता - डॉ. सागर देशपांडे*

सर्वच क्षेत्रात सुरक्षेची आवश्यकता – डॉ. सागर देशपांडे*

पुणे दि. ५ मार्च – उद्योग क्षेत्रापुरतीच सुरक्षा विषयाची व्याप्ती मर्यादित नाही तर बदलत्या काळात सर्वच क्षेत्रात त्याची आवश्यकता आहे आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी, अशी अपेक्षा जडण-घडण मासिकाचे संपादक आणि जेष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी आज येथे व्यक्त केली.
राष्ट्रीय सुरक्षा संघटनेच्या वतीने ५४ वा राष्ट्रीय सुरक्षा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. देशपांडे बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष एस. जी. क्षीरसागर, खजिनदार जी. एस. लिमये, विश्वस्त अशोक कुदळे, अमित पाटील, सुहास कुलकर्णी व एस. टी. काळे यावेळी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी कोर्स मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे जितेंद्र धुमाळ आणि द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या शीतल कांबळे यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली.

विविध क्षेत्रातील सुरक्षेबाबतच्या
सद्यस्थितीचा आढावा घेऊन डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, सुरक्षेबाबत सर्व क्षेत्रांतील आवश्यकता लक्षात घेऊन त्यासाठी कशा प्रकारे व्यवस्थापन करता येईल, याचा विचार गांभीर्याने करायला हवा. यासाठी सुरक्षेबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, कारण सुरक्षेबाबत आज असुरक्षितता जाणवत आहे. यासाठीच अभ्यासक्रमाचा उपक्रम स्वागतार्ह असून तो अधिक व्यापक करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वस्त सुहास कुलकर्णी यांनी स्वागत करुन सुरक्षा दिवसाचे महत्त्व सांगितले. संस्था अध्यक्ष एस. जी. क्षीरसागर यांनी अभ्यासक्रम चालविण्याबाबतची भूमिका मांडली आणि उद्योग क्षेत्रातील सुरक्षेचे महत्व विषद केले. एस. टी. काळे यांनी संघटनेच्या आजवरच्या वाटचालीची माहिती सांगितली आणि समाजात विविध क्षेत्रातील सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता सांगितली. खजिनदार जी. एस. लिमये यांनी सुरक्षा दिवसाचे महत्त्व पटवून दिले. विश्वस्त अशोक कुदळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा परिचय करुन दिला तर विश्वस्त अमित पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. संघटनेचे सदस्य अरुण देशपांडे यांनी तयार केलेल्या सुरक्षा विषयावरील काव्य रचनेचे सादरीकरण विश्वस्त सुहास कुलकर्णी यांनी केले. विश्वस्त माधव गांगल यांनी आभार मानले.

सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे आजी आणि माजी निदेशक,अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील सुरक्षितता अधिकारी व संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, हितचिंतक, कुटुंबिय कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते.
——–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments