Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीसीओएस' पासून बचावासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब गरजेचा* *ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ....

पीसीओएस’ पासून बचावासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब गरजेचा* *ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. संजीव खुर्द ; अ‍ॅक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशन आणि डॉ. खुर्द गायनॅक इंडॉस्कॉपी व आयव्हीएफ सेंटर यांच्यातर्फे पीसीओएस विषयी जनजागृती अभियान*

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम विषयीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. यासाठी तरुणी व महिलांनी स्वत:च्या आरोग्यकडे विशेष लक्ष द्यायला हवे. औषधांपेक्षा निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. जंक फूड कमी करुन घरचे अन्न खाणे तसेच 80 टक्के सात्विक आहार व 20 टक्के व्यायाम करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. संजीव खुर्द यांनी व्यक्त केले.

अ‍ॅक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशन आणि डॉ. खुर्द गायनॅक इंडॉस्कॉपी व आयव्हीएफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एरंडवणे भरत कुंज कॉलनी येथील डॉ. खुर्द हॉस्पिटल येथे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) विषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे डॉ.शंतनु जोशी, डॉ. साक्षी जोशी, डॉ. साधना खुर्द, डॉ. आदित्य खुर्द आदी उपस्थित होते. स्त्रियांकरिता मोफत वैद्यकीय शिबीर, व्याख्यान व समुपदेशनाद्वारे याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच याविषयी माहिती देणारे फलक लावून प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले.

डॉ. संजीव खुर्द म्हणाले, अनेक तरुणी व महिलांमध्ये अनियमीत पाळी ही तक्रार असते. याशिवाय तारुणपिटीकांमध्ये अडचणी आणि वंधत्व या तीन विषयांमध्ये पीसीओएस आढळतो. हा कोणत्याही प्रकारचा रोग नसून सिंड्रोम आहे. अनेक लक्षणं एकत्रितपणे म्हणजे सिंड्रोम. याकरिता योग्य आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे. पीसीओएस हा स्त्रियांमध्ये १० ते २० टक्के या प्रमाणात आढळणारा, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत जाणारा आणि वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी एका महत्वाचे कारण असणारा आजार आहे.

ते पुढे म्हणाले, मासिक पाळीतील अनियमितता, चेह-यावरील जास्तीचे केस आणि काही रुग्णांमध्ये वजन वाढणे, ही याची लक्षणे असू शकतात. पीसीओएस मुळे वंध्यत्व, मधुमेह, हृदयरोगापासून ते गर्भाशयाच्या कर्करोगापर्यंत गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. याविषयी संस्थेमध्ये संशोधन प्रकल्प देखील सुरु आहे.

डॉ. शंतनु जोशी यांनी आहार आणि पीसीओएस शी असणारा संबंध याविषयी माहिती सांगितली. आहार प्रेरित दाह आणि पीसीओएस चा संबंध याविषयी विवेचन केले. तसेच डॉ. शंतनु जोशी यांनी त्यांच्या पीसीओएस संशोधना संदर्भात विवेचन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments