Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय धोरणात सुधारणा गरजेची, आमदार रासनेंनी घेतली...

जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय धोरणात सुधारणा गरजेची, आमदार रासनेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट* * *मुख्यमंत्र्यांचे गृहनिर्माण आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश*

पुणे (दि ७ मार्च): पुणे शहरातील विशेषत गावठाण भाग असणाऱ्या पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी आग्रही भूमिका घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शासकीय धोरणामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ठाणे तसेच मुंबईमध्ये करण्यात आलेल्या सुधारित धोरणांच्या धर्तीवर पुणे शहरासाठी स्वतंत्र सुधारित धोरण राबवावे. सोबतच कसबा मतदारसंघाला संपूर्ण झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया देखील सुलभ करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

शहरातील अनेक वाड्यांचे बांधकाम अतिशय जिर्ण अवस्थेत असून नागरिकांना धोकादायक परिस्थितीत राहावं लागत आहे. विद्यमान नियमांमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे वाड्यांच्या पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरात राबवण्यात आलेल्या धोरणानुसार पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी. यासाठी संबंधित विभागाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करून हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय सोडवण्याला गती देण्याची मागणी रासने यांनी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहनिर्माण आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले “पुणे शहर आणि कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य कार्यवाही होईल”.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments