पुणे, मार्च ११, २०२५ – पुण्यातील प्रीमियर लाइफस्टाइल डेस्टिनेशन कोपा मॉल सर्व पुणेकरांना रंगांचा हा उत्सव अनोख्या आणि शाश्वत पद्धतीने साजरा करण्यासाठी आमंत्रित करत असून त्यासाठी १४ मार्च रोजी ‘होली कार्निव्हल – अ फ्लोरल फिएस्टा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सेलिब्रेशनमध्ये सुगंधी फुलांच्या सौंदर्यासह अविस्मरणीय आणि सुसंस्कृत पद्धतीने होळीचा अनुभव घेता येणार आहे.
प्रेक्षकांना होळीच्या बहारदार उत्सवात समरसून जाण्याचा अनुभव घेता येईल, कारण इथे सुगंधी पाकळ्यांमुळे सेलिब्रेशन आणखी प्रसन्न होईल. प्रसिद्ध डीजे दमदार बीट्ससह स्टेजवर धमाल उडवून देत सगळं वातावरण तालमय आणि आनंदी ठेवतील. बरसणाऱ्या पाकळ्यांखाली नाचणं असो किंवा या उत्सवाचा जोश अनुभवणं असो, इथे आजवर कधी न घेतलेला होळीचा अनुभव मिळेल.
फुलं आणि संगीताबरोबरच पाहुण्यांना खास तयार केलेले खाद्यपदार्थ व पेयांचा आस्वाद घेता येईल. रूचकर आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांबरोबरच विविध कॉकटेल्स त्यांचा आनंद द्विगुणित करतील.
कोपा मॉलमध्ये नाममात्र शुल्कात होळीचा हा अनुभव घेता येणार असून त्यात सुगंध, रंग, पाकळ्या आणि आनंद एकत्र येऊन उपस्थितांना अविस्मरणीय आठवणी देतील.
ठिकाण: कोपा मॉल
तारीख: १४ मार्च २०२५
वेळ: संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३०


