पुणे,13 मार्च 2025 : भारतातील आघाडीच्या लक्झरी सिनेमा चेन असलेल्या सिनेपोलिस इंडियाने आमिर खान फिल्म फेस्टीव्हलची घोषणा केली आहे.14 मार्च रोजी आमिर खान यांचा वाढदिवस असून या तारखेपासून सुरू होणाऱ्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये भारतभरातील सिनेपोलिसमध्ये आमिर खानचे लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये दिल चाहता है,लगान,रंग दे बसंती,थ्री इडियटस,दंगल,तारें जमीं पर,जो जीता वही सिकंदर,पीके इत्यादींचा समावेश आहे.


