Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिलेनिअल्सपासून जेन झेड पर्यंत: उद्योजकांच्या पिढीचा उदय स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची...

मिलेनिअल्सपासून जेन झेड पर्यंत: उद्योजकांच्या पिढीचा उदय स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या तरुण भारतीय स्त्रियांमध्ये आढळले सर्वाधिक उद्योजक चैतन्य

राष्ट्रीय, मार्च 13, २०२५: जगभरातील स्त्रियांमध्ये उद्योजकतेचे चैतन्य उच्च स्तरावर आहे, विशेषत: तरुण पिढीमध्ये ते अधिक दिसून येत आहे. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची, काम आणि आयुष्य यांच्यातील लवचिकता वाढवण्याची आणि जगात बदल घडवून आणण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यात दिसून येत आहे.

 

मास्टरकार्ड ने पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या नवीन संशोधन अहवालानुसार, भारतातील जवळपास निम्म्या (४५ टक्के) स्त्रियांनी स्वत:चा व्यवसाय चालवण्याचा विचार केला आहे. या वाढीमध्ये मिलेनिअल (वय २९ ते ४४ वर्ष) गटातील स्त्रियांचा वाटा लक्षणीय (४६ टक्के) आहे, तर त्यापाठोपाठ जेन झेड वयोगटाचा क्रमांक (४५ टक्के) लागतो. जेन एक्स (वय ४५ ते ६० वर्ष) आणि बेबी बूमर्स (वय ६१ ते ७९ वर्ष) यांच्या तुलनेत व्यवसायाचा विचार करण्याचे प्रमाण तरुण पिढीत अधिक आहे. जेन एक्स व बेबी बूमर्स या दोन्ही वयोगटांमध्ये हे प्रमाण प्रत्येकी ३८ टक्के आहे.

 

भारतीय स्त्रियांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या घटकांमध्ये तीन घटक आघाडीवर आहेत. स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा (५१ टक्के), आयुष्य व कामात अधिक चांगला समतोल राखण्याचा शोध (४४ टक्के) आणि पारंपरिक कार्यरचनेपासून स्वातंत्र्य (४० टक्के) हे ते तीन घटक आहेत. शिवाय, सुमारे अर्ध्या (४६ टक्के) भारतीय स्त्रियांकडे सध्या काहीतरी जोड व्यवसाय आहे. बेबी बूमर्स वयोगटातील (वय ६१ ते ७९ वर्ष) स्त्रियांमध्ये जोडव्यवसायाचे प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या वयोगटातील स्त्रिया अधिक पैसे कमावण्यासाठी जोड व्यवसाय करण्यास अन्य वयस्कर वयोगटांच्या तुलनेत अधिक प्रेरित आहेत.

 

पुढील पाच वर्षांत आपले उत्पन्न वाढणे अपेक्षित आहे असे म्हणणाऱ्या स्त्री व्यावसायिकांचे प्रमाण पुरुष व्यावसायिकांच्या तुलनेत किंचित अधिक आहे (स्त्रियांमधील प्रमाण ८९ टक्के; पुरुषांमधील प्रमाण ८७ टक्के). पुढील पाच वर्षांत आपल्या व्यवसायात ५० टक्क्यांहून अधिक वाढ होईल, असे दहा पैकी जवळपास चार (३८ टक्के) स्त्रियांना अपेक्षित आहे, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ २० टक्के आहे. त्यांना ज्या क्षेत्रांत व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, ती क्षेत्रे म्हणजे शिक्षण (२८ टक्के), खाद्यपदार्थ व पेय (२१ टक्के) आणि ऑनलाइन विक्री (१६ टक्के).

 

स्त्री उद्योजकांपुढील अडथळे

 

उद्योजकतेची इच्छा स्त्रियांमध्ये स्पष्ट दिसत असूनही स्त्री उद्योजकांपुढे, यांमध्ये काही आधीपासून व्यवसाय सुरू केलेल्या स्त्रियांचाही समावेश होतो, खूप अडथळे आहेत असे या संशोधनातून दिसून आले आहे. दहापैकी चारहून अधिक (४२ टक्के) स्त्रियांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायला आवडेल पण आपल्याला हे शक्य होणार नाही असेही त्यांना वाटते. हे प्रमाण जेन झेड स्त्रियांमध्ये अधिक (४६ टक्के) आहे.

 

स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यापासून परावृत्त करणारे प्रमुख अडथळ्यांपैकी एक म्हणजे ग्राहकवर्गाबाबत मर्यादित आकलन असणे (३८ टक्के). शिवाय, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक संसाधनांची कमतरता भासत असल्याचा दावा एक तृतीयांशांहून अधिक (३६ टक्के) स्त्रियांनी केला आहे, असा दावा करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजेच २९ टक्के आहे. निधीची कमतरता (२४ टक्के), अपयशाचा काळ (२९ टक्के) ही आणखी काही आव्हाने स्त्रियांना स्वत:चा व्यवसाय सुरू करताना भेडसावतात.

 

आधीपासून व्यवसाय सुरू केलेल्या स्त्रियांनीही घर सांभाळणे आणि आयुष्य व कामाचा समतोल या बाबींशी बेसुमार झगडावे लागत असल्याचे नमूद केले आहे. मुलांना सांभाळण्याची व्यवस्था होणे हे व्यवसाय सुरू करण्यापुढील आव्हान असल्याचे सांगणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे (स्त्रियांमध्ये १६ टक्के, तर पुरुषांमध्ये ७ टक्के).

 

पाठिंब्याची आवश्यकता

 

सर्वोत्तम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाल्यास व्यवसाय सुरू करण्यात आत्मविश्वास वाटतो, असे ४३ टक्के स्त्रियांनी नमूद केले, तर व्यवसाय योजना तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाल्यास व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिक आत्मविश्वास वाटतो असे ४२ टक्के स्त्रियांनी सांगितले, पुरुषांमध्ये असे सांगणाऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे ३५ टक्के व ३४ टक्के होते.

 

दोन पंचमांश (४१ टक्के) भारतीय स्त्रिया व्यवसाय सुरू करण्यात मदत व्हावी म्हणून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्याचे मार्ग शोधत असतात, हे प्रमाण जेन एक्स (वय ४५ ते ६० वर्ष) स्त्रियांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच ५४ टक्के आहे. दहापैकी चार (३८ टक्के) स्त्रियांना कोडिंगसारख्या तंत्रज्ञानात्मक कौशल्यांमध्ये अधिक चांगले प्रशिक्षण प्राप्त करण्याची इच्छा आहे. शिवाय, सुमारे दोन पंचमांश (३६ टक्के) स्त्री सस्थापकांच्या मते,

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments