नवी दिल्ली, 18 मार्च, 2025: तुम्ही कॅम्पसमध्ये फिरताय आणि तुम्हाला गुपचुप आवडणारा किंवा आवडणारी तुमच्या मित्राचा/ची किंवा मैत्रीणीचा/ची खास मित्र किंवा मैत्रीणी दिसतेय, असा वर्गमित्र किंवा मैत्रीण ज्याला तुम्ही मदत करू शकले नाही परंतु वर्गात बघितले, किंवा आंतर-महाविद्यालयीन संगीत महोत्सवामध्ये तुमच्या मनात भरले होते असे कोणीतरी तुम्हाला दिसतेय अशी कल्पना करून बघा. तुमच्या हृदयाची धडधड वाढवणारे हे क्षण आहेत. टिंडरचे इन-ऍप फिचर असलेले टिंडर यू इन इंडियाची सुरुवात झाल्यामुळे, पहिले पाऊल टाकणे हे अगदी ‘लाईक’ करण्यासारखे किंवा ’सुपर लाईक’ करण्यासारखे सोपे झाले आहे. हे सर्वकाही त्या कॅम्पसमधील न झालेल्या भेटी वास्तव जीवनात आणण्यासाठी आहे – ते सुद्धा कुठलाही चुकीचा DM प्राप्त न होता.
टिंडर यू हे खास करून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. यात तुमचा वैध महाविद्यालयीन ईमेल ऍड्रेस (भारतामध्ये .edu.in, .ac.in, किंवा .in) टाकून, तुम्ही एक नवीन, वैयक्तिक आणि प्रामाणिक जागा प्राप्त कराल जिथे तुम्ही इतर विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊ शकता. पडताळणी झाल्यानंतर, तुम्ही तुमचे टिंडर प्रोफाइल तुमची महाविद्यालयीन माहिती, क्लब आणि आवडी जोडून तुम्हाला हवे तसे तयार करून घेऊ शकता – ज्यामुळे तुम्हाला हवे त्या विद्यार्थ्यांसोबत जुळणे तुम्हाला सोपे जाईल.
युवा पिढीतील अविवाहितांचा ऑनलाइन डेटिंगकडे कल असतो – नुकत्याच करण्यात आलेल्या वनपोल सर्व्हेमध्ये असे लक्षात आले की, भारतामधील युवांनी 57%* (18-25 वयोगटातील) डेटिंग ऍप्सद्वारे अर्थपूर्ण संबंध तयार केले आहेत – टिंडर यू ते काय शोधत आहेत यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे संबंध अगदी घरासारखे वाटावे याची काळजी घेते, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे सामाजिक संबंध मोठे करणे आणि महाविद्यालयातील आठवणी कायमस्वरूपी मनात ठेवणे सोपे जाते. डेटिंगचा विचार करता, 67% प्रतिसादकर्ते म्हणाले, “मी डेटिंग ऍपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेट केले,” तर 55% प्रतिसादकर्त्यांची ते भेटलेल्या व्यक्तीसोबत मैत्री झाली आहे. लोक सामान्यपणे कसे भेटतात असे विचारल्यावर, 45% लोकांना ऑनलाइन डेटिंग ऍप बद्दल माहिती दिली, ज्यात कामाच्या ठिकाणचे आणि शैक्षणिक संस्थामधील 34% लोक आहेत.
टिंडर यू का निराळे आहे? विद्यार्थी त्यांच्या कॉलेजची माहिती जोडू शकतात आणि ते ज्या क्लब आणि सोसायटीशी संबंधित आहेत त्याची सुद्धा माहिती दाखवू शकतात, जेणेकरून त्यांच्यासारख्याच आवडी असलेल्या लोकांसोबत ते सहजतेने जुळू शकतात.
सर्व्हेमध्ये असे दिसून आले आहे की, टिंडर वापरकर्त्यांपैकी 39% वापरकर्त्यांना डेटिंग प्रोफाइलचा सर्वात आकर्षक पैलू म्हणजे आवडी-निवडी शेयर करणे हा वाटला. दरम्यान, 35% लोकांना सारख्या छंदाबद्दलच्या प्रश्नाने संवाद सुरू करणे आवडते आणि 54% लोकांना आवडी-निवडी शेयर करून चर्चा करणे आवडते. टिंडर यू पहिल्या संवादांना अगदी सहज, आकर्षक आणि प्रामाणिक बनविण्यासाठी या निरीक्षणांचा विचार करते.
टिंडर यू इंडियाच्या संभाषण प्रमुख अदिती शोरेवाल म्हणाल्या, “विद्यापीठामधील जीवन हे पूर्णपणे नवीन अनुभवाबद्दलच असते, आणि टिंडर यू तुमचा विश्वासी साथीदार आहे त्यामुळे – तुम्ही अभ्यासाचा साथीदार शोधताय, संगीत मैफिलीमधला साथीदार शोधताय की कोणीतरी आणखी खास शोधताय – तुम्ही खरोखरच त्याचा शोध घेऊ शकता. जेन झेड साठी ही फारच सुरक्षित आणि आकर्षक जागा आहे ज्याठिकाणी खरे संबंध अगदी लायब्ररी किंवा कॉरिडॉरमध्ये एखाद्या हव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीला टक्कर देण्याइतके सहज तयार होतात. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सुरक्षित, प्रामाणिक आणि त्यांच्या स्वतःच्या अटींनूसार एकमेकांसोबत संपर्कात राहू शकतात याबद्दल आम्हाला फार आनंद आहे.”
कशामुळे टिंडर यू कॅम्पस डेटिंगचा सर्वोत्तम अनुभव बनतो?
विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले: तुम्ही तुमचे पदवीचे वर्ष आणि त्यानंतरच्या वर्षाबद्दल माहिती सांगून संवाद सुरू ठेवू शकता आणि शेयर केलेल्या आवडी-निवडी सांगून जुळण्यासाठी कॉलेज क्लब आणि सोसायटीमधील तुमचा सहभाग यांवर भर देऊ शकता.
स्थानिक संबंध: तुमच्या विद्यापीठ आणि जवळच्या कॉलेजमधील सहकाऱ्यांसोबत कनेक्ट होऊन तुमच्या कॅम्पस क्रूला भेट देऊ शकता.
आता विचित्र DM नाहीत: तुम्हाला आवडणारी व्यक्ती शोधताय? त्यांना ‘सुपर लाईक द्या आणि विचित्र DM स्किप करा.
सुरक्षित, प्रामाणिक आणि मजेशीर: टिंडर यू फक्त नवीन लोकांना भेटण्यासाठी तयार करण्यात आलेले नसून त्यामध्ये खऱ्या संबंधांसाठी एक सुरक्षित जागा दिली जाते जिथे प्रत्येक जण विद्यार्थी आहे हे तुम्हाला माहिती असते.
टिंडर यू ला अप्लाय करण्यासाठी:
टिंडर ओपन करा आणि प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
एडिट इन्फो आयकॉनवर टॅप करा.
शाळा किंवा महाविद्यालय येथे खाली स्क्रोल करा आणि तुमची शाळा/महाविद्यालयीन माहिती जोडा.
अप्लाय फॉर टिंडर यू वर टॅप करा.
तुमचा विद्यार्थी ईमेल ऍड्रेस लिहा आणि पडताळणी करा.
नोंदणी झाल्यानंतर, तुम्ही तुमचा अॅप आयकॉन आमच्या विशेष टिंडर यू आयकॉनवर देखील अपडेट करू शकता— हे तुम्ही सेटिंग्जमध्ये ‘अॅप आयकॉन’ वर नेव्हिगेट करून किंवा टिंडर यू™ ऑनबोर्डिंग पूर्ण करताना दिसणार्या प्रॉम्प्टला फॉलो करून (फक्त iOS) करू शकता.
टिंडर यू आता भारतातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे, जे वैयक्तिक, संबंधित आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित आणि मजेदार डेटिंग अनुभव देते. म्हणून, तुम्ही फ्रेशर असाल, सिनियर असाल किंवा त्या दरम्यान कुठेतरी असाल – टिंडर यू अमर्याद गोष्टीं
चा आनंद घ्या.
###


