पुणे : शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी पुस्तके, तसेच स्टेशनरी साहित्य उपलब्ध करून देणारे प्रगती बुक सेंटर आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.शहराच्या मध्यवस्तीत गेली ५० वर्षे ही संस्था कार्यरत असून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी लकी ड्रॉ कूपन योजना सादर केली आहे.
दि.१ ते ३० मार्च या कालावधीत ५०० रुपये अथवा त्यापेक्षा जास्त किंमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ कूपन देण्यात येणार आहे.संस्थेच्या तीनही दुकानासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
सन १९७५ मध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रगती बुक सेंटर स्थापन करण्यात आले आहे. स्व. चंपकभाई, श्री कल्याणजीभाई श्री दिनेशभाई, आणि प्रदीपभाई फुरिया या चार बंधूंनी पुस्तकाचे पहिले दुकान अप्पा बळवंत चौकात सुरु केले. ग्राहकांचा विश्वास आणि वाढता प्रतिसाद यामुळे आजवरच्या वाटचालीत दुकानांची संख्या तीन झाली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पुस्तके , स्टेशनरी, शालेय साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजवरच्या संस्थेच्या यशस्वी वाटचालीत सर्वश्री श्री दिनेश नागडा, श्री पंकज फुरिया आणि सर्व कर्मचारी वर्गाचा महत्वाचा सहभाग आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी संस्थेने शहरात लायब्ररी योजना सुरु केली असून त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्या त्या वर्षाची परीक्षा झाल्यावर ती पुस्तके परत सेंटरमध्ये जमा केल्यावर पुस्तकाची ५० टक्के रक्कम परत केली जाते. विविध विषयांची सुमारे एक हजार प्रकाशकांची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येतात. शालेय,महाविद्यालयीन,स्पर्धा परीक्षा, बाल साहित्य, पुस्तके, पाककला विषयक पुस्तके आणि आवश्यक स्टेशनरी साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. अशी माहिती संस्थेचे भागीदार श्री दिनेशभाई फुरिया यांनी सांगितली आहे.


