पुणे:- *”आपल्या कुटुंबा बाहेर राहणारा, समाजातील वेगळ घटक तृतीयपंथी यांना राहण्यासाठी सामाजिक संस्थेने किंवा शासनाने स्वतंत्र वस्तीगृहाची उभारणी केली पाहिजे”* अशी अपेक्षा उमेश वाघ यांनी व्यक्त केली. मुकुंद माधव फाउंडेशन रितू छाब्रिया यांच्यातर्फे गोखलेनगर येथे 260 तृतीयपंथींना आपण व साडी वाटपाचा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुकुल माधवचे योगेश रोकडे, यास्मिन शेख उपस्थित होते. उमेश वाघ पुढे म्हणाले *”या घटकाला आपले कुटुंब नसते, अशा वेळेस जिथे राहायला जाईल तिथे समाज वेगळ्या नजरेने बघतो, त्यांना राहायला देत नाही”* अशावेळी त्यांना एकटेपणाची भावना निर्माण होते, त्यामुळे शहरात सामाजिक संस्थेने किंवा शासनाने त्यांच्यासाठी उपस्थित उभारणे अत्यंत गरजेचे वाटते.
तृतीयपंथी गोखले नगर- जनवाडी शाखेचे अध्यक्ष कविता पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास इमरान तांबोळी, सागर वाघ, लक्ष्मी थोरात, वैभव परदेशी, प्रतीक्षा पवार अदि उपस्थित होते.


