लक्ष्मीरोड, पुणे मार्च २०२५: दागिने क्षेत्रातील विक्रीवाढ ही बाजारपेठेतील ग्राहकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता, लोकप्रियता आणि मागणी वाढल्यावर विस्ताराची संधी मिळते. याच महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून आपला १९३ वर्षांपासून वारसा चालवत आलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ने २३ मार्च २०२५ रोजी लक्ष्मीरोड येथील आपल्या ऐतिहासिक प्रमुख दालनाच्या नूतनीकरणासह, नवीन दालन सुरू केले.
पुणे बाजारात सोने, चांदी, प्लॅटिनमसह डायमंड आणि रंगीत जेमस्टोन सारख्या दागिन्यांच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन ‘पीएनजी ज्वेलर्स’ने आपल्या दालनाचे एकत्रित क्षेत्रफळ २०,००० चौ. फुटांपर्यंत* वाढवले आहे. या दोन्ही दालनांचे उद्घाटन बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, श्री. पराग गाडगीळ आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या ऐतिहासिक प्रसंगी ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ सौरभ गाडगीळ म्हणाले, “पुणे आमच्यासाठी खास आहे कारण येथील प्रमुख दालन आमचा वारसा आणि विश्वासाचे आदर्श रूप दर्शवते. सध्या जगभरात आमची एकूण ५३ दालन आहेत. रिटेल नेटवर्क मजबूत करण्यासाह हा विस्तार आम्हाला ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी मदत करतो. यामुळे त्यांना पारंपरिक आणि कलात्मकतेने सजलेले दागिने सहज उपलब्ध होतात. आम्ही पुणेकरांना उत्कृष्ट दागिने आणि सेवा प्रदान करत राहू याची हमी देतो.”
महाराष्ट्राच्या परंपरेचा आदर करत प्रमुख दालनामध्ये आधुनिकतेचा अनुभव देण्याच्या दृष्टीने पारंपरिक वाड्याच्या स्वरूपात त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या फ्लॅगशिप स्टोरमध्ये खास सोन्याचे दागिने, कलकत्ती, टेम्पल ज्वेलरी, प्राचीन आणि कुंदनचे दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ज्यात लग्नासाठीचे खास दागिने तसेच खाजगी मेकअप स्टेशनसह विवाह लाउंजची सोय करण्यात आली आहे जेणेकरून लग्नापूर्वी स्त्रियांना आपल्या वेडिंग लुकची तयारी करण्यास मदत होईल. तर नवीन दोन-मजली इमारत डायमंड, प्लॅटिनम, अनकट, पोल्की आणि मौल्यवान रंगीत रत्नांच्या दागिन्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. या विस्तारामुळे ‘पीएनजी ज्वेलर्स’ची उत्पादन रेंज ३०-४०% ने वाढली आहे ज्यामुळे सर्व प्रकारच्या दागिन्यांच्या खरेदीदारांना अधिक पर्याय आणि समृद्ध खरेदी अनुभव मिळत आहे.
‘पीएनजी ज्वेलर्स’च्या अम्बॅसडर आणि बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाल्या, “पीएनजी ज्वेलर्ससारख्या परंपरा आणि उत्कृष्टतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रॅंडच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे. आधुनिक डिझाइन्सला अंगीकारताना परंपरेचा सन्मान राखण्याची बांधिलकी ‘पीएनजी ज्वेलर्स’ला इतरांपेक्षा वेगळे करते. ‘पीएनजी ज्वेलर्स’ नेहमी विश्वास, परंपरा आणि कलात्मकता टिकवणारा ब्रॅंड आहे.”
‘पीएनजी ज्वेलर्स’चे नवीन स्टोअर त्यांच्या फ्लॅगशिप स्टोअरपासून ५०० मीटरच्या अंतरावर स्थित असून, या भव्य उद्घाटनाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी जुन्या सोन्याच्या देवाणघेवाणीवर ०% घट, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ४०% पर्यंत सूट आणि डायमंड दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पर्यंत सूट अशा विशेष सवलती देत आहे.


