Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedMolbio Diagnostics च्या ProRad एक्स-रे उपकरणामुळे 100-डे टीबी चॅलेंज मध्ये क्षयरोगाच्या लवकर...

Molbio Diagnostics च्या ProRad एक्स-रे उपकरणामुळे 100-डे टीबी चॅलेंज मध्ये क्षयरोगाच्या लवकर निदान होण्याच्या शोधाला मिळाली चालना

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण 72 लाखांहून अधिक Truenat उपकरणे बसवली गेली असून, खाजगी क्षेत्रात सुमारे 8 हजार उपकरणे राष्ट्रीय स्तरावर स्थापित करण्यात आली आहेत.

 

– डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्र प्रारंभिक पातळीवर क्षयरोग निदान वाढवण्यासाठी 4 ProRad Altas एक्स-रे उपकरणांच्या जोडणीसह आघाडीवर आहे.

 

 

 

महाराष्ट्र, 21 मार्च 2025: भारत सरकारने 100-दिवसांचे क्षयरोग आव्हान (100-Day TB Challenge) हाती घेतले असून देशभरात चाचण्या, निदान आणि उपचार प्रक्रियेचा वेग वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टाला गती देण्यात आली आहे. विशेषतः दुर्गम आणि सेवावंचित भागांमध्ये या सक्रिय आरोग्य मोहिमेतून लवकर निदान आणि तातडीच्या उपचारांवर भर देण्यात आला आहे. या सरकारी उपक्रमाला पाठिंबा देताना Molbio Diagnostics ने महत्वाची भूमिका निभावत अत्याधुनिक निदान उपाय सादर केले आहेत. त्यामध्ये ultraportable ProRad Altas एक्स-रे उपकरणे आणि नाविन्यपूर्ण Truenat मॉलीक्युलर निदान प्रणाली यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक उपायांनी देशभरातील क्षयरोग चाचणी मोहिमेची कार्यक्षमता आणि पोहोच वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

 

 

 

Molbio Diagnostics ने जागतिक क्षयरोग दिन साजरा करताना भारताच्या महत्त्वाकांक्षी 100-दिवसांच्या क्षयरोग आव्हानाच्या यशस्वी पूर्ततेला अधोरेखित केले. या मोहिमेअंतर्गत कंपनीच्या अत्याधुनिक निदान उपायांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी आणि प्रभावी कामगिरी दर्शवण्यात आली. या मोहिमेच्या केंद्रस्थानी अल्ट्रापोरटेबल ProRad एक्स-रे उपकरणे आणि नाविन्यपूर्ण Truenat मॉलीक्युलर निदान प्लॅटफॉर्म होते. यांच्या समन्वयामुळे संपूर्ण देशभर क्षयरोगाची चाचणी, लवकर निदान आणि जलद शोध प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. या प्रगत निदान साधनांची धोरणात्मक अंमलबजावणी भारतातील विविध भागांमध्ये प्रभावीपणे केली गेली. त्यामध्ये उत्तर भारतात 8 ProRad उपकरणे, दक्षिण भारतात 21, पूर्व भारतात 20 आणि पश्चिम भारतात 49 ProRad उपकरणे कार्यरत आहेत.

 

 

 

ProRad Atlas, हे अत्यंत हलके आणि अचूक परिणाम देणारे अल्ट्रापोर्टेबल एक्स-रे उपकरण असून त्यामुळे छातीची जलद एक्स-रे तपासणी करणे शक्य झाले. यामुळे दुर्गम आणि सेवावंचित भागांमध्येही क्षयरोगाचे सुरुवातीला लवकर निदान करणे सुलभ झाले. यास पूरक म्हणून, Molbio च्या पोर्टेबल, बॅटरी-वर चालणाऱ्या आणि रिअल-टाइम PCR प्लॅटफॉर्म असलेल्या या क्रांतिकारी Truenat प्लॅटफॉर्मने तासाभरात अचूक निदान करून जलद उपचार प्रक्रियेला चालना दिली. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या एकात्रीकरणातून भारताने 100-दिवसांच्या कालावधीत क्षयरोगाच्या तपासणी, निदान आणि उपचार प्रक्रियेत महत्त्वपूर्ण गती मिळवली.

 

 

 

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल बोलताना Molbio Diagnostics चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीराम नटराजन म्हणाले, “Molbio Diagnostics सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण आणि सुलभ निदान उपाय उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. आमचे ProRad Atlas आणि Truenat प्लॅटफॉर्म देशभर आणि विशेषतः दुर्गम भागांमध्ये क्षयरोगाचे अचूक आणि वेगवान निदान करण्यास मदत करत असून त्यातून आरोग्यसेवा परिसंस्था उंचावण्याप्रती असलेली आमची बांधिलकी दिसून येते. भारताने 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य गाठावे यासाठी आम्ही सातत्याने देशभरात आरोग्य प्रणाली मजबूत करणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानावर भर देत राहू.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments