Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून होम अप्‍लायन्‍सेससाठी स्‍पेशल विस्‍तारित वॉरंटी सादर; सॅमसंग केअर+ च्‍या माध्‍यमातून ग्राहकांना...

सॅमसंगकडून होम अप्‍लायन्‍सेससाठी स्‍पेशल विस्‍तारित वॉरंटी सादर; सॅमसंग केअर+ च्‍या माध्‍यमातून ग्राहकांना मिळणार मन:शांती

गुरूग्राम, भारत – मार्च २८, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आपले निवडक रेफ्रिजरेटर्स आणि फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍ससह सॅमसंग केअर+ वर भारतभर विशेष विस्‍तारित वॉरंटी मोहिम लाँच केली आहे.

 

ही ऑफर ३० एप्रिल २०२५ पर्यंत वैध आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना उच्‍च आकर्षक व किफायतशीर दरामध्‍ये त्‍यांच्‍या अप्‍लायन्‍सेससाठी सुधारित संरक्षण सुनिश्चित करता येईल. अप्‍लायन्‍स खरेदी निर्णयांना गती देण्‍यामध्‍ये टिकाऊपणा महत्त्वपूर्ण घटक असण्‍यासह हा उपक्रम ग्राहकांना सॅमसंगच्‍या विश्‍वसनीय विक्री-पश्‍चात्त सेवांच्‍या माध्‍यमातून अतिरिक्‍त सोयीसुविधा आणि दीर्घकालीन अशुरन्‍स देतो.

 

या स्‍पेशल ऑफरअंतर्गत, ग्राहक निवडक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सवर फक्‍त ४९९ रूपयांच्‍या विशेष किमतीमध्‍ये ४,२९० रूपयांच्‍या सॅमसंग केअर+ सह २-वर्ष विस्‍तारित व सर्वसमावेशक वॉरंटीचा लाभ घेऊ शकतात. तसेच, रेफ्रिजरेटर्ससाठी सॅमसंग फ्रेंच डोअर व साइड-बाय-साइड (एसबीएस) मॉडेल्‍सवर ४४९० रूपयांच्‍या वॉरंटीसाठी ४४९ रूपयांच्‍या आणि ५०० लिटरखालील फ्रॉस्‍ट फ्री मॉडेल्‍सवर १२७० रूपयांच्‍या वॉरंटीसाठी ३४९ रूपयांच्‍या विशेष किमतींमध्‍ये १-वर्ष विस्‍तारित वॉरंटी देत आहे.

 

ग्राहक सॅमसंगचे रिटेल स्‍टोअर्स, Samsung.com आणि देशभरातील इतर रिटेल आऊटलेट्समध्‍ये या मर्यादित कालावधीच्‍या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. सॅमसंग प्रबळ विक्री-पश्‍चात्त सेवेच्‍या पाठबळासह उच्‍च दर्जाची उत्‍पादने देत ग्राहक समाधानाला प्राधान्‍य देत आहे, तसेच नाविन्‍यता आणि विश्‍वसनीयतेच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तींचे जीवन संपन्‍न करण्‍याचे आपले ध्‍येय अधिक दृढ करत

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments