Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॉनरॅड पुणे लाँच करणार कॉनरीड

कॉनरॅड पुणे लाँच करणार कॉनरीड

वाचनाची आवड पुनरुज्जीवित करणारा पुण्याच्या साहित्यक्षेत्रातील नवा अध्याय

वर्ल्ड बुक डेनिमित्त 21 एप्रिल रोजी आयोजित होणारी ही खास मालिका पुण्यातील पुस्तकप्रेमींना आपल्या आवडत्या लेखकांशी खास संवाद साधण्याकरिता आमंत्रित करत आहे – तेही शहराच्या सर्वात आलिशान ठिकाणी

पुणे, 18 एप्रिल 2025- पुण्यातील आघाडीचे लक्झरी डेस्टिनेशन कॉनरॅड, पुणे आता कॉनरीड या त्यांच्या खास मालिकेच्या माध्यमातून शहराच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे. मासिक (महिन्यातून एकदा) उपक्रम असलेल्या कॉनरीडच्या माध्यमातून लेखक, विचारवंत आणि वाचनप्रेमी एकत्र येऊन कथा, कल्पना आणि विचारांची देवाणघेवाण करू शकतील. वर्ल्ड बुक डेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 21 एप्रिल रोजी ही संकल्पना सुरू होत असून, कॉनरीडचा उद्देश असा एक समुदाय उभा करणे आहे, ज्यांना पुस्तकांच्या पानांमध्ये आनंद आणि संवादांमध्ये अर्थ सापडतो.

लेखकांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा सन्मान करण्यासाठी बनविण्यात आलेल्या या मालिकेमध्ये पुणेकरांना दर महिन्याला एकत्र येत खास वातावरणात आपल्या आवडत्या लेखकांशी अगदी जवळून भेटण्याची संधी मिळणार आहे. कॉनरॅड पुणेच्या “संस्कृती आणि आतिथ्य” या तत्वज्ञानाचा विस्तार म्हणून साकारलेले कॉनरीड ही एक चळवळ आहे जेथे बौद्धिक चर्चांना प्रोत्साहन मिळेल, नव्या पब्लिशिंग ट्रेंडचा शोध घेतला जाईल आणि ख्यातनाम लेखकांशी विशेष संवाद साधता येईल. साहित्य असो, अर्थशास्त्र असो की प्रत्यक्ष जीवनाचे अनुभव – कॉनरीड हा एक असा डायनॅमिक प्लॅटफॉर्म ठरेल जिथे कल्पनांना केंद्रस्थानी ठेवले जाईल.

 

या मालिकेच्या पहिल्या पर्वात सहभागी होणार आहेत प्रसिद्ध आणि बेस्ट सेलिंग पुस्तकांच्या लेखिका व शेअर मार्केट एक्स्पर्ट देविना मेहरा, ज्यांच्यासोबत संवाद साधतील मिंटच्या पर्सनल फायनान्स विभागाचे प्रमुख नील बोराटे. यामध्ये ते देविना मेहरा यांच्या नव्या पुस्तकावर चर्चा करतील – मनी, मिथ्स अँड मंत्राज – द अल्टिमेट इन्व्हेस्टमेंट गाईड. यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र आणि बुक सायनिंग होईल – त्यामुळे वाचकांना आपल्या आवडत्या पुस्तकांच्या लेखकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.

या उपक्रमाबाबत बोलताना कॉनरॅड पुणेचे जनरल मॅनेजर, अभिषेक सहाय म्हणाले,“कॉनरीडच्या माध्यमातून आम्ही बौद्धिकतेचा, सखोल संवादांचा आणि समाजकेंद्रित नवा आलिशान अनुभव देण्यासाठी आमचे दालन उघडत आहोत. ही मालिका पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणाप्रति आमचं योगदान आहे – जिथे वाचनप्रेमी आणि विचारवंत एकत्र येतील, चर्चा करतील, नव्या कल्पनांना चालना देतील आणि प्रेरित राहतील. देविना मेहरासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वासोबत ही सुरुवात करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि पुढील अनेक अध्यायांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

कॉनरीडचा भाग होण्याबाबत लेखिका देविना मेहरा म्हणाल्या, “कॉनरॅड पुणे येथे कॉनरीडच्या पहिल्या पर्वाचा भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या दोन अत्यंत आवडत्या गोष्टी – पुस्तके आणि गुंतवणूक/फायनान्स – यांचे कॉम्बिनेशन, तेही उबदार, खुल्या आणि खऱ्या अर्थाने जिज्ञासू वातावरणात होणं, ही एक उत्तम गोष्ट आहे. मला खात्री आहे की ही संध्याकाळ अगदी अशीच संस्मरणीय ठरेल. पुस्तकं, प्रश्न आणि जीवनाचे खरे अनुभव मोकळेपणाने मांडण्यासाठी एक हक्काची जागा निर्माण केल्याबद्दल मी कॉनरॅड पुणेची आभारी आहे. माझ्या आजवरच्या प्रवासाला आणि सखोल अनुभवांना सर्वांसोबत शेअर करण्याची मी वाट पाहते आहे.”

कॉनरॅड पुणेच्या सुंदर आणि उठावदार पार्श्वभूमीवर सजलेली ही ‘कॉनरीड’ ची प्रत्येक आवृत्ती, साहित्य शोधाचे आकर्षण आणि कॉनरॅडच्या खास आतिथ्यशीलतेची उब एकत्र आणेल. ही अशी अनुभवात्मक क्षणांची मालिका असेल जी विचारांना चालना देणारी आणि मनाला कायम लक्षात राहणारी असेल. ही एक अशी समाज निर्मिती आहे जिथे पुस्तकप्रेमींच्या प्रेमाला त्यांच्या सारख्याच व्यक्तींपर्यंत पोहोचवतं.

 

कॉनरॅड हॉटेल्स अ‍ॅण्ड रिसॉर्ट्सबद्दल माहिती:

जगभरातील पाच खंडांमध्ये जवळपास 50 प्रतिष्ठित हॉटेल्ससह विस्तारित असलेले कॉनरॅड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स हे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, प्रभावी अनुभव आणि काळानुरूप कलाकृती यांचा सुरेख मेळ घालत सजग प्रवाशांसाठी प्रेरणादायी ठिकाण ठरतं. कॉनरॅड ही अशी जागा आहे जिथे पाहुण्यांना आदरातिथ्ययुक्त सेवा आणि खास अनुभवांसह स्थानिक संस्कृतीशी खरीखुरी नाळ जोडता येते. पुरस्कारप्राप्त हॉटेल सेवांसोबतच, कॉनरॅड ब्रँड आता जगातील लोकप्रिय स्थळांमध्ये उत्तम डिझाइन, अत्याधुनिक सुविधा आणि हेतुपूर्ण सेवा असलेल्या निवास प्रकल्पांद्वारेही विस्तार करत आहे. कॉनरॅड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचा अनुभव घ्या conradhotels.com वर किंवा Hilton Honors या नावाजलेल्या अ‍ॅपवर. Hilton Honors सदस्यांना, हिल्टनच्या अधिकृत माध्यमातून थेट बुकिंग केल्यास, तत्काळ लाभ मिळतात. कॉनरॅड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स विषयी अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या stories.hilton.com/conradhotels या संकेतस्थळाला, तसेच ब्रँडचे इंस्टाग्राम आणि ट्विटर हॅन्डल

फॉलो करा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments