पुणे, ता. 21 एप्रिल :
पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त विविध भाषांतील लेखकांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि संवाद पुणे चे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
डॉ. श्यामा घोणसे, पूजा भडांगे (मराठी), जयश्री भोपटकर (जपानी), महेश देवकर (संस्कृत),
डॉ. पुष्पा गुजराथी (गुजराथी), पल्लवी गोरे (इंग्रजी), संजय भारद्वाज (हिंदी) आणि शब्बीर मुजाहिद (उर्दू) या साहित्यिकांचा समानार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान करण्यात येतील. माजी खासदार प्रदीप रावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात बुधवारी
(२३ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.


