Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय पातळीवरील 'हेल्थ - लोकल टू ग्लोबल' या विषयावर नर्सिंग कॉन्फरन्स संपन्न*...

राष्ट्रीय पातळीवरील ‘हेल्थ – लोकल टू ग्लोबल’ या विषयावर नर्सिंग कॉन्फरन्स संपन्न* कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन’च्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन

पुणे : कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांच्या वतीने ‘हेल्थ – लोकल टू ग्लोबल’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील नर्सिंग कॉन्फरन्स नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय परिषदेत भारतातील आरोग्य सेवा व्यवस्था, सामाजिक आरोग्यावर होणारे परिणाम तसेच टेलिमेडिसिन, डिजिटल हेल्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत आरोग्य सेवा प्रणाली यावर सखोल चर्चा करण्यात आली.

कॉन्फरन्समध्ये वक्ते म्हणून भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली येथील प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे, एस.टी.ई.एस., सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका प्रा. रेश्मा साळवे, भारती विद्यापीठ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ. वीणा साखरदंडे, कॉलेज ऑफ नर्सिंग, बी. जे. एम. सी. पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ. संगीता भुजबळ आणि भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे येथील कम्युनिटी मेडिसिन विषयाच्या प्राध्यापिका डॉ. वर्षा वैद्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर व खजिनदार सुरेखा जाधवर यांनी परिषदेस मार्गदर्शन केले.

नर्सिंगचे विद्यार्थी, शिक्षक आणि विविध रुग्णालयांतील नोंदणीकृत स्टाफ नर्सेस यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्यावतीने १० क्रेडिट पॉईंट्स मान्य करण्यात आले. सतत व्यावसायिक विकासाच्या माध्यमातून आरोग्यसेवेतील नवे प्रवाह, जागतिक पातळीवरील धोरणे, तांत्रिक प्रगती आणि आरोग्य समस्यांवर प्रभावी उपाययोजना यांचा व्यापक अभ्यास या परिषदेमध्ये करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments