Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedयंदा मातृदिनानिमित्त कॅलिफोर्निया बदामांच्‍या पौष्टिकतेसह तुमच्‍या आईच्‍या आरोग्‍याची अधिक काळजी घ्‍या

यंदा मातृदिनानिमित्त कॅलिफोर्निया बदामांच्‍या पौष्टिकतेसह तुमच्‍या आईच्‍या आरोग्‍याची अधिक काळजी घ्‍या

भारत, मे , २०२५: कोणताही दिवस अविरत प्रेम, काळजी आणि प्राबल्‍याला व्‍यक्‍त करू शकत नाही, जे दररोज आई आपल्‍याला देत असते. आपण काही खाल्‍ले असल्‍याची खात्री करण्‍यापासून सर्वांचे आरोग्‍य उत्तम असल्‍याची विचारपूस करण्‍यापर्यंत आई नेहमी इतरांना प्रथम प्राधान्‍य देते. पण आपण कितीवेळा तिची विचारपूस करतो किंवा तिचे आरोग्‍य किंवा स्‍वास्‍थ्‍याबाबत विचारतो? यंदा मातृदिनानिमित्त आपली नेहमी काळजी घेणाऱ्या आपल्‍या आईची विशेष काळजी घेऊया. तिच्‍याप्रती असलेली काळजी दाखवण्‍याचा सोपा मार्ग म्‍हणजे तिच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये कॅलिफोर्निया बदामांचा समावेश करणे. आईला दिवसभर अनेक कामे करावी लागतात, सतत धावपळ करावी लागते, ज्‍यामुळे बदामांमधून तिला ऊर्जा मिळण्‍यास मदत होऊ शकते, आरोग्‍य उत्तम राहू शकते आणि त्‍वचेला पोषण मिळण्‍यासोबत त्‍वचा कोमल राहू शकते.
किंग ऑफ नट्स म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या कॅलिफोर्निया बदामांमध्‍ये १५ आवश्‍यक पौष्टिक घटकांसह प्रोटीन, झिंक, मॅग्‍नेशियम आणि व्हिटॅमिन ई असते. दररोज मूठभर बदामांचे सेवन केल्‍याने रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे नियमन होण्‍यास, हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यास, त्‍वचा चमकदार होण्‍यास, वजनावर नियंत्रण राहण्‍यास आणि ऊर्जा मिळण्‍यास मदत होऊ शकते.
कॅलिफोर्निया बदामांना तिचे सोबती बनवा, जे ती कामामध्‍ये व्‍यस्‍त असताना तिची काळजी घेतील. यंदा मातृदिनानिमित्त तिला पौष्टिक व विचारशील गिफ्ट देत तिचे आरोग्‍य किती महत्त्वाचे आहे हे दाखवून द्या.
बॉलिवुड अभिनेत्री व सेलिब्रिटी सोहा अली खान म्‍हणाल्‍या, ”माझ्यासाठी आरोग्‍य हीच खरी संपत्ती आहे, माझा यावर खूप विश्‍वास आहे आणि मी दररोज आरोग्‍यदायी जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न करते. मला आठवते, बालपणी देखील मी माझ्या आईला असे गिफ्ट द्यायची, जे तिच्‍या आरोग्‍याची काळजी घेईल आणि मी दरवर्षी मातृदिनाला ही परंपरा पाळते. मला माझ्या आईसाठी विशेष गील्‍ट-फ्री डेसर्ट बनवायला आवडते, जे स्‍वादिष्‍ट व पौष्टिक असते आणि मी अधिक पौष्टिकता व आरोग्‍यासाठी त्‍यामध्‍ये कॅलिफोर्निया बदामांची भर करते. या बदामांमध्‍ये आवश्‍यक पौष्टिक घटक असतात, तसेच स्‍वाद व आरोग्‍याचे परिपूर्ण मिश्रण देतात. या परंपरेला खास बनवणारी बाब म्‍हणजे माझी मुलगी देखील या परंपरेचे पालन करत आहे. तिने देखील माझ्याप्रमाणे आरोग्‍याला प्रथम प्राधान्‍य देणारे गिफ्ट्स निवडण्‍यास सुरूवात केली आहे.”
फिटनेस व सेलिब्रिटी इन्‍स्‍ट्रक्‍टर यास्‍मीन कराचीवाला म्‍हणाल्‍या, ”अनेक तरूण आणि माझ्यासोबत प्रशिक्षण घेतलेल्‍या नवमाता वर्कआऊटपूर्वी किंवा वर्कआऊटनंतर काय खावे याबाब‍त विचारतात. सप्‍लीमेंट्सबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात असली तरी मी त्‍यांना नैसर्गिक, पौष्टिक पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्‍यास प्रेरित करते. मी नेहमी कॅलिफोर्निया बदामांची शिफारस करते, कारण या बदामांमध्‍ये प्रोटीन, झिंक, आयर्न, उत्तम फॅट्स व व्हिटॅमिन ई यांसारखे १५ आवश्‍यक पौष्टिक घटक असतात, जे स्‍नायूंची रिकव्‍हरी होण्‍यास, ऊर्जा मिळण्‍यास आणि एकूण आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यास मदत करतात. यंदा मातृदिनानिमित्त मी प्रत्‍येक आईला आठवण करून देऊ इच्छिते की तुमचे आरोग्‍य महत्त्वाचे आहे. फिटनेससाठी वेळ काढणे आणि बदामांसारख्‍या साध्‍या, पौष्टिक फूड्सची निवड करणे इतरांची काळजी घेण्‍यासोबत स्‍वत:ची काळजी घेण्‍याचा सर्वोत्तम मार्ग आहे.”
नवी दिल्‍लीमधील मॅक्‍स हेल्‍थकेर येथील डायटेटिक्‍सच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्‍हणाल्‍या, ”माता म्‍हणून आपण नेहमी आपल्‍या मुलांची काळजी घेतो, तसेच आपले पती योग्‍य आहार सेवन करत असल्‍याबाबत विचारपूस करतो, पण आपण स्‍वत:च्‍या पोषणाकडे किती लक्ष देतो? सत्‍यस्थिती म्‍हणजे अनेक महिला शांतपणे पीसीओएस, हायपोथायरोडिझम किंवा रजोनिवृत्ती अशा आरोग्‍यसबंधित आव्‍हानांचा सामना करतात आणि यामुळे आरोग्‍यदायी वजन राखणे आव्‍हानात्‍मक होऊ शकते. पण फक्‍त वजन नाही, तर एकूण आरोग्‍यावर देखील परिणाम होऊ शकतो. वय कितीही असो प्रत्‍येकीने आपले आरोग्‍य उत्तम ठेवले पाहिजे. म्हणून मी नेहमी दैनंदिन आहारामध्‍ये बदामांसारख्‍या पौष्टिक फूड्सचा समावेश करण्‍याची शिफारस करते. दिवसातून मूठभर बदामांचे सेवन केल्‍याने आहारांदरम्‍यान पोट भरल्‍यासारखे वाटू शकते, कारण बदामांमध्‍ये भूकेचे शमन करण्‍याचे गुण असतात, ते ऊर्जा पातळी उत्तम ठेवण्‍यास मदत करतात आणि शरीरासाठी आवश्‍यक पौष्टिक घटक देतात, हे सर्व नैसर्गिक, विनासायासपणे मिळते.”
न्‍यूट्रिशन व वेलनेस कन्‍सल्‍टण्‍ट शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, ”हृदयसंबंधित आजार अनेकदा ‘पुरूषांची’ समस्‍या मानली जाते, पण हे तथ्‍य नाही. नुकतेच प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या डेटामधून निदर्शनास येते की हा आजार आता भारतातील महिलांमधील मृत्‍यूचा प्रमुख कारण बनला आहे, जेथे जवळपास १८ टक्‍के महिलांचा मृत्‍यू या आजारामुळे होतो, हे प्रमाण कर्करोगापेक्षा अधिक आहे. आपण अनेकदा आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांमध्‍ये प्रतिबंधाबाबत चर्चा करण्‍याची गरज आहे. लहान, पण प्रबळ पाऊल म्‍हणजे दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश करणे. ते एलडीएल कोलेस्‍ट्रॉल कमी करण्‍यास, तसेच हृदयाचे नुकसान करणारा दाह कमी करण्‍यास मदत करू शकतात. व्‍यस्‍त जीवन जगणाऱ्या महिलांसाठी मूठभर बदाम हृदयाचे आरोग्‍य व एकूण आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी साधा, पोषक मार्ग ठरू शकतो.”
कॉस्‍मेटोलॉजिस्‍ट आणि स्किन एक्‍स्‍पर्ट डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता म्‍हणाल्‍या, ”दैनंदिन व्‍यस्‍त व धावपळीच्‍या जीवनामध्‍ये माता अनेकदा त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या गरजांकडे दुर्लक्ष करतात, त्‍यांचे स्‍वत:चे आरोग्‍य व बाह्यरूपाची काळजी घेण्‍यास विसरतात. पण त्‍या उत्तम व फिट दिसण्‍यास पात्र आहेत. यामुळे बदाम मोठे बदल घडवून आणू शकतात. बदामांमध्‍ये आरोग्‍यदायी फॅट्स व व्हिटॅमिन ई (विशेषत: अल्‍फा-टोकोफेरल) असतात, जे अॅण्‍टी-एजिंग गुणधर्म आणि त्‍वचेला फायदे देण्‍यासाठी ओळखले जाते. नियमित बदामांचे सेवन केल्‍याने त्‍वचेचा पोत सुधारण्‍यास आणि अतिनील किरणांपासून त्‍वचेचे संरक्षण होण्‍यास मदत होऊ शकते. म्‍हणून यंदा मातृदिनी तुमच्‍या आईला दररोज मूठभर बदामांचे सेवन करण्‍यास प्रेरित करा. हे त्‍वचेला आतून पोषण देण्‍यासोबत त्‍वचा चमकदार बनवण्‍याचे लहान व महत्त्‍वपूर्ण पाऊल आहे.”
लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेत्री श्रीया सरन म्‍हणाल्‍या, ”आई बनणे माझ्यासाठी सर्वात सुंदर व जीवनाला कलाटणी देणारा अनुभव राहिला आहे. पण नेहमी व्‍यस्‍त असलेली नवमाता म्‍हणून मला स्‍वत:च्‍या शरीराला योग्‍य फूड्ससह, विशेषत: प्रोटीनसह पोषण देण्‍याचे महत्त्व समजले आहे. म्हणून मी नियमितपणे कॅलिफोर्निया बदामांचे सेवन करते. हे बदाम प्रोटीनचे नैसर्गिक स्रोत आहेत, मधल्‍या वेळेत सहजपणे खाता येतात आणि या बदामांमध्‍ये आवश्‍यक पौष्टिक घटक आहेत, जे मला ताकद व ऊर्जा देतात. मी शूटिंगदरम्‍यान किंवा व्‍यस्‍त क्षणांदरम्यान बदामांचे सेवन करते, तसेच मी काम व मातृत्‍वामध्‍ये संतुलन राखण्‍याचा प्रयत्‍न करते.”
प्रख्‍यात भारतीय चित्रपट अभिनेत्री वानी भोजन म्‍हणाल्‍या, ”मातृदिन जवळ आला असताना मी नेहमी गिफ्ट्सचा शोध घेते, ज्‍यामधून मी माझ्या आईची किती काळजी घेते हे दिसून येते. माझ्या या गिफ्टमध्‍ये कॅलिफोर्निया बदामांचा क्‍यूरेटेड बॉक्‍स अव्‍वलस्‍थानी असतो. मी माझ्या आईला नेहमी दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये मूठभर बदामांचा समावेश करण्‍यास प्रेरित करते, कारण बदामांमध्‍ये आवश्‍यक पौष्टिक घटक असतात आणि इतर स्‍नॅक्‍सच्‍या तुलनेत ते सर्वोत्तम निवड आहेत. मला आवडणारी बाब म्‍हणजे मी बदामांना भारतीय मसाल्‍यांसह भाजते आणि सायंकाळी चहासोबत सर्व्‍ह करते. यामधून मी माझी आई व्‍यस्‍त असताना देखील पौष्टिक फूड्सचे सेवन करण्‍याची खात्री घेते. बदामांचे सेवन उत्तम सवय आहे, पण दीर्घकाळपर्यंत माझ्या आईचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यास मदत करू शकते.”
यंदा मातृदिनी, आपल्‍या आईला आरोग्‍याचे गिफ्ट द्या. आईला कॅलिफोर्निया बदामांच्‍या पौष्टिकतेची भेट देणे तिच्‍याप्रती केअर दाखवण्‍याचा उत्तम व विचारशील मार्ग आहे. आईला उत्तम आरोग्‍य, ऊर्जा आणि एकूण स्‍वास्‍थ्‍यासाठी तिच्‍या दैनंदिन आहारामध्‍ये या पोषण-संपन्‍न पॉवरहाऊस नट्सचा समावेश करण्‍यास प्रेरित करा.
###
कॅलिफोर्नियाचे बदाम हा नैसर्गिक, आरोग्‍यदायी व दर्जेदार खाद्यपदार्थ आहे. कॅलिफोर्नियातील ७,६०० हून अधिक बदाम उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियाकर्ते उद्योग यांच्या वतीने आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया विपणन, कृषी व उत्‍पादनाच्‍या सर्व पैलूंसाठी त्‍यांच्‍या संशोधन-आधारित दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून बदामांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. याच्याशी संबंधित उद्योगांतील अनेक कुटुंबांचा हा परंपरागत व्यवसाय आहे. कॅलिफोर्नियातील मॉडेस्टोमध्ये असलेल्या आणि १९५० मध्ये स्थापन झालेली आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया ही ना-नफा तत्त्वावर असलेली संस्‍था आहे. ही संस्था युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागांतर्गत बदाम उत्पादकांच्या कृतिशील सहभागातून फेडरल मार्केटिंग ऑर्डरचे व्यवस्थापन करण्याचे काम करते. आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया किंवा बदामांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी www.almonds.in येथे भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments