Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedबिस्लेरी इंटरनॅशनल आणि पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सने 12 तासांत पुनर्वापरासाठी...

बिस्लेरी इंटरनॅशनल आणि पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सने 12 तासांत पुनर्वापरासाठी 79,738.60 किलोग्रॅम प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

कोईम्बतूर, 06 फेब्रुवारी, 2024: बिस्लेरी इंटरनॅशनल या भारतातील आघाडीच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर कंपनीने 12 तासांच्या उल्लेखनीय कालावधीत तब्बल 79,738.60 किलोग्रॅम प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. ही विलक्षण कामगिरी बिस्लेरी ग्रीनर प्रॉमिस या प्रभावी उपक्रमाद्वारे पर्यावरणीय शाश्वततेसाठी बिस्लेरीची वचनबद्धता अधोरेखित करते.

बिस्लेरी इंटरनॅशनल आणि पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, कोईम्बतूर यांनी तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे मेगा कलेक्शन ही मोहीम आयोजित केली आणि 2018 मध्ये ब्रुहत बेंगलुरु महानगरपालीकेने (बीबीएमपी) ने 33,355.55 किलोग्रॅम वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्याचा विक्रम मागे टाकला. संकलनाच्या प्रयत्नात पीएसजी कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी, बिस्लेरी ‘बॉटल फॉर चेंज’ ची टीम, इतर शैक्षणिक संस्था, हाऊसिंग कॉलनीतील रहिवासी, कॉर्पोरेट हाऊसेस आणि कोईम्बतूरमधील सार्वजनिक ठिकाणांवरील संकलनाचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments