Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedदहावीच्या परीक्षेत जाधवर इन्स्टिटयूटस्चा शंभर टक्के निकाल* जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या...

दहावीच्या परीक्षेत जाधवर इन्स्टिटयूटस्चा शंभर टक्के निकाल* जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्च्या शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालय, प्रा.डॉ. सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालय आणि पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गुणवत्तेकडे लक्ष देऊन अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाच्या मेघश्री पाटील हिने ८९.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. अनुष्का शिंदे ८९ टक्के गुण मिळवून द्वितीय तर धनश्री मोहिते हिला ८६.२० टक्के मिळाले असून तिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्रा.डॉ. सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयातील उत्कर्ष खुंटे याने ८६.६० टक्के मिळवून प्रथम, तन्मय कोलगिरे व मिलिंद कापदाने याने ८४.६० टक्के मिळवून द्वितीय व स्नेहल पवार ही ८४.४० टक्के मिळवून तृतीय आली आहे.

तसेच पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या जितेंद्र चौधरी व ओम तटकारे याने ८९.२० टक्के मिळवत प्रथम, रोशनी घडी हिने ८८.६० टक्के द्वितीय व प्रज्ञा अलंगे हिला ८६.४० टक्के गुण मिळाले असून तिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर व उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी विद्यार्थ्यांचे परिश्रम, सुनियोजन, अभ्यास आणि शिक्षकांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचे यश असल्याचे सांगितले. तसचे यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचेही अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments