मुंबई, १३ मे २०२५: एंड-टू-एंड पुरवठा साखळीतील एक आघाडीची जागतिक कंपनी असलेल्या डीपी वर्ल्डने नवी मुंबईतील तळोजा येथे एक अत्याधुनिक, शाश्वत कोल्ड चेन गोदाम सुरू केले आहे. ही नवीन सुविधा भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात आणूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आणि फार्मास्युटिकल्स, एफएमसीजी (दुग्धजन्य पदार्थ, गोठलेले अन्न, नाशवंत कृषी उत्पादने) व क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) क्षेत्रांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी डीपी वर्ल्डच्या वचनबद्धतेला बळकटी देते.
या १,१०,००० चौरस फूट आकारमानाच्या ग्रेड-ए गोदामात ११,००० पॅलेट पोझिशन्स आहेत आणि नाशवंत आणि तापमान-संवेदनशील कार्गोची सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक करण्यासाठी अनेक तापमान झोनना वापरता येतात. तळोजा-डोंबिवली रोडपासून फक्त ८ किमी अंतरावर आणि नवी मुंबई विमानतळ (३९ किमी), जेएनपीए बंदर (४३ किमी) आणि प्रमुख कंटेनर फ्रेट स्टेशन (४० किमी) जवळ असलेली ही सुविधा मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राला सेवा देण्यासाठी उत्तम ठरेल.
अद्ययावत तापमान नियंत्रण तंत्रज्ञान आणि पुढील पिढीतील रेफ्रिजरेशन सिस्टमने सुसज्ज असलेली ही सुविधा अचूक थंडावा, ऊर्जा कार्यक्षमता आणि कमी उत्सर्जन शक्य करण्यासाठी शाश्वत रेफ्रिजरंट्स वापरते. ते दुग्धजन्य पदार्थ, गोठलेले अन्न, सीफूड, मांस, औषधे आणि नाशवंत कृषी उत्पादनांसह तापमान-संवेदनशील उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करू शकते.
डीपी वर्ल्ड उपखंडाचेचे कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स आणि कोल्ड चेनचे उपाध्यक्ष अनूप चौहान म्हणाले: “उच्च दर्जाच्या अन्न आणि आरोग्यसेवा लॉजिस्टिक्सच्या वाढत्या मागणीमुळे तळोजा येथील आमची नवीन कोल्ड चेन सुविधा व्यवसायांना भविष्यासाठी तयार उपाययोजना देईल. भारतातील विकसित होत असलेल्या एफएमसीजी क्षेत्रातील व्यवसायांना वाढण्यास मदत करण्यासाठी शाश्वतता, कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान या गोष्टी देते.”
ही सुविधा सुरक्षा, स्वच्छता आणि अनुपालनाच्या सर्वोच्च मानकांनुसार डिझाइन केली गेली आहे. ती अन्न आणि आरोग्यसेवा वस्तूंसाठी सर्व नियामक मानकांची पूर्तता करते. यातील प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये विशेष पंप रूम, उच्च-कार्यक्षमता अग्निसुरक्षा प्रणाली, रॉकवूल इन्सुलेशन, थर्मल-सील्ड आर्किटेक्चर आणि चोवीस तास देखरेख यांचा समावेश आहे. गोदामात तापमान आणि आर्द्रता निरीक्षण अलार्म आणि रिअल-टाइम पर्यावरण ट्रॅकिंग देखील आहे. त्यामुळे ही प्रणाली व्यापक कार्गो संरक्षण देते. त्यामुळे संवेदनशील साहित्य त्यांच्या साठवणूक आणि हाताळणी दरम्यान सुरक्षित आणि स्थिर राहते.
या अनावरणामुळे डीपी वर्ल्डचे भारतातील वेअरहाऊसिंग नेटवर्क बळकट झाले आहे. ते आता ६०+ ठिकाणी ५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षाही जास्त आहे. गोदामे, पोर्ट टर्मिनल्स, रेल्वे फ्रेट, फ्रेट फॉरवर्डिंग आणि एक्सप्रेस लॉजिस्टिक्स यांच्याद्वारे डीपी वर्ल्ड भारताच्या आर्थिक वाढीला पाठिंबा देणारी लवचिक, एकात्मिक पुरवठा साखळी उपाययोजना तयार करत आहे.
डीपी वर्ल्डकडून तळोज्यातील नवीन सुविधेद्वारे कोल्ड चेन क्षमतांचे मजबुतीकरण तळोजा येथील १,१०,००० चौ फुटांच्या सुविधेमुळे डीपी वर्ल्डच्या गोदामांचा पाया भारतभरात ५० लाख चौ. फुटांपर्यंत पोहोचला असून फार्मास्युटिकल्स आणि एफएमसीजी क्षेत्रांच्या वाढीला त्याची मदत होईल.
RELATED ARTICLES


