पुणे १६ जून २०२५ :
मेडट्रॉनिक पीएलसी या आरोग्यसेवा तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी कंपनीने पुणे येथे नवीन ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) चे उद्घाटन केले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये ५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक या नवीन केंद्राची स्थापना आणि विस्तारीकरणाला साह्य करेल. नाविन्यता आणि ऑपरेशनल सर्वोत्तमतेला गती देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले हे सेंटर कार्यचालनाच्या पहिल्या वर्षामध्ये ३०० हून अधिक सर्विस व सॉफ्टवेअर रोजगार निर्माण करण्याची अपेक्षा आहे, तसेच पुढील चार वर्षांमध्ये ही आकडेवारी दुप्पट करण्याची योजना आहे.
चार दशकांहून अधिक काळापासून डायबेटिस व्यवसायाने उल्लेखनीय नाविन्यतांच्या माध्यमातून मधुमेह असलेल्या व्यक्तींना सेवा दिली आहे, ज्यामागे निष्पत्ती सुधारण्याचा आणि व्यक्तींना त्यांच्या मधुमेहाबाबत विसरायला लावण्याचा उद्देश आहे. भारतातील पुणे येथील हे जागतिक दर्जाचे, अत्याधुनिक सेंटर या मिशनला पूर्ण करण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला सक्षम करेल.
डायबेटिस जीसीसी सर्वोत्तमतेचे सेंटर असेल, जे ग्राहक केअर, प्रगत विश्लेषण, डिजिटल तंत्रज्ञान सेवा देते. तसेच आर्थिक सेवा व ऑपरेशन्सला पाठिंबा देखील देते. भारतातील हे विस्तारीकरण अनेक रोजगार संधी निर्माण करेल.
जीसीसी जागतिक व्यवसाय क्षेत्राला नवीन आकार देत असताना भारत या सेंटर्ससाठी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास आले आहे. उद्योग अहवालांमधून देशातील जीसीसी बाजारपेठ २०३० पर्यंत १०० बिलियन डॉलर्सचा टप्पा पार करण्याचा आणि २.५ दशलक्ष रोजगार निर्माण करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रमुख ठिकाणांपैकी एक पुणे शहराने पसंतीचे गंतव्य म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले आहे, जे कुशल टॅलेंट समूह आणि संपन्न तंत्रज्ञान इकोसिस्टम आहे, जिला डायनॅमिक स्टार्टअप संस्कृतीचे पाठबळ आहे.
या उद्घाटनाबाबत मत व्यक्त करत मेडट्रॉनिक डायबेटिसच्या कार्यकारी उपाध्यक्ष व अध्यक्ष क्यू डल्लारा म्हणाल्या, “अलिकडील वर्षांमध्ये भारताने स्वत:ला आघाडीचे जागतिक आयटी हब म्हणून प्रबळपणे स्थापित केले आहे. पुणे व भारतभरातील अविश्वसनीय टॅलेंट समूह आमच्या उद्देशाची संलग्न आहे, तो म्हणजे मधुमेह असलेल्या व्यक्तींना जीवन सोपे करणाऱ्या सोल्यूशन्ससह पाठिंबा देणे. हे सेंटर फक्त विकासासाठी नाही तर डायबेटिस केअर सोपी करण्याच्या आणि जगभरातील अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या मिशनच्या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे.”
मेडट्रॉतिनक डायबेटिसच्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इंडियाचे साइट डायरेक्टर आणि सीनियर कस्टमर सर्विस डायरेक्टर विजेंद्र सिंग म्हणाले, “उद्घाटन करण्यात आलेले हे सेंटर आमच्या क्षमता वाढवण्यासोबत कार्यचालन सर्वोत्तमतेच्या माध्यमातून जगभरातील मधुमेह व्यवस्थापनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती आमच्या समर्पिततेला अधिक दृढ देखील करते. आमची स्थानिक संस्थांसोबत सहयोग करण्याची योजना आहे, ज्याद्वारे आरोग्यसेवेमधील अर्थपूर्ण प्रगतीला चालना देण्यात येईल आणि अधिक रोजगार संधी निर्माण होतील.”
ही मोठी गुंतवणूक भारतातील आरोग्यसेवा व तंत्रज्ञान इकोसिस्टम दृढ करण्याप्रती, तसेच जीसीसींसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्याप्रती आणि नाविन्यता व सर्वोत्तम रूग्ण निष्पत्तींना गती देण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्याप्रती मेडट्रॉनिकच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
मेडट्रॉनिकने नुकतेच डायबेटिस व्यवसायाला स्वतंत्र, स्वावलंबी सार्वजनिकरित्या व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये विभक्त होण्याच्या आपल्या हेतूची घोषणा केली (announced), जेथे ही कंपनी स्वतंत्र व्यवसाय म्हणून कार्यसंचालनाला सुरूवात केल्यानंतर मिनीमेड म्हणून ओळखली जाईल.


