Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन!*

कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन!*

 

 

नाशिक:- नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी कविवर्य नारायण सुर्वे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिले जातात. मराठी साहित्यातील कथासंग्रह, कादंबरी आणि काव्यसंग्रह अशा तीन साहित्य कृतीस *नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार* देण्यात येणार आहेत. उपरोक्त उल्लेखलेल्या प्रत्येक साहित्य कृतीस पुरस्काराचे स्वरूप शाल, रोख रक्कम ₹१००००/-, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

 

सदर पुरस्कारांसाठी लेखक, कवींनी *०१ एप्रिल २०२४ ते ३१ मे २०२५* या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपल्या साहित्यकृतींच्या प्रत्येकी दोन प्रती, स्वपरिचय पत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो इ.

*सचिव, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, मानव सेवा केंद्र, राजे संभाजी स्टेडियम शेजारी, सिंहस्थनगर, सिडको, नाशिक ४२२००९ फोन: ०२५३ २३७८२४४* या पत्यावर पोस्टाने पाठवावेत अथवा वाचनालयात समक्ष येऊन पोहच करावेत.

*साहित्य पाठवण्याची अंतिम मुदत दि. ३१ जूलै २०२५ पर्यंत आहे.*

तरी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

संपर्क:

रविकांत शार्दूल 9890680243

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments