Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedफर्ग्युसन महाविद्यालयात “जिओ फिजिक्स"वर कार्यशाळा

फर्ग्युसन महाविद्यालयात “जिओ फिजिक्स”वर कार्यशाळा

 

 

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गणित विभाग आणि भूविज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने “भू-भौतिकीय माहिती विश्लेषणातील धडे आणि आव्हाने” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. भारतात “जिओ फिजिक्स” या शीर्षकाखाली आयोजित झालेली ही पहिलीच आंतरशाखीय कार्यशाळा ठरली.

 

आजच्या काळात हवामान बदल, सार्वजनिक आरोग्याच्या संकटे, ऊर्जा टिकाव, सायबर सुरक्षा, यंत्रअभ्यास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या जागतिक आव्हानांचे स्वरूप बहुविषयक झाले आहे. ही आव्हाने सोडवण्यासाठी विविध शाखांतील ज्ञान, साधने आणि दृष्टिकोन यांचे एकत्रीकरण आवश्यक बनले आहे. हा दृष्टिकोन या कार्यशाळेमध्ये केंद्रस्थानी होता.

 

फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. श्याम मुडे, डॉ. विनयकुमार आचार्य, लोचना महाजन, वृषाली लिमये, निशिगंधा हरपळे यांनी संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments