Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedचित्रकला ही केवळ कला नव्हे तर कल्पना ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित...

चित्रकला ही केवळ कला नव्हे तर कल्पना ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित ; ग्राहक पेठ व पारले यांच्यातर्फे आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

पुणे : कलेच्या क्षेत्रात जे असतात ते ‘जिनियस’ असतात. कारण ते वेगळा विचार करतात. चित्रकला ही केवळ कला नसून कल्पना आहे. डोक्यातील नवनवीन कल्पना हा महत्वाचा विचार आहे. त्यामुळे चित्रकलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याकरिता कायम प्रयत्न सुरु ठेवायला हवे, असे मत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठ व पारले यांच्यातर्फे आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी पारले कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर उमेश कामत, डिव्हिजन सेल्स मॅनेजर कार्तिक शहा, पंकज सिंग, ग्राहक पेठेचे अध्यक्ष एस.आर. कुलकर्णी, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, स्पर्धा संचालक शिवराम हाके आदी उपस्थित होते.

चारुहास पंडित म्हणाले, चित्रकलेतील विद्यार्थी घडविताना चित्रकला शिक्षकांचे योगदान महत्वाचे असते. विविध प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थी घडत असतात. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून मुलांसाठी व्यासपीठ निर्माण होते. तसे व्यासपीठ नियमितपणे निर्माण झाल्यास चित्रकलेसारख्या कला जिवंत राहतील, असेही त्यांनी सांगितले.

सूर्यकांत पाठक म्हणाले, सन १९९२ पासून गणेशोत्सवात बिस्किटाचे देखावे सादर करीत आहे. ते लहान मुलांना अत्यंत आवडतात. त्यामुळे गेल्या ९ वर्षांपासून मुलांकरिता चित्रकला स्पर्धा देखील आयोजित केली जाते. मुलांशी जवळचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जात असून यंदा ५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. इयत्ता ५ वी ते १० वी दरम्यान तीन गटात ही स्पर्धा झाली. हर्षदा कारेकर यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments